मसाला डोसा - Masala Dosa
Masala Dosa in English कृती वाचल्यावर त्याखालील टीपा जरून पाहा. साहित्य : डोसा १ कप उडीद डाळ अडीच ते पाऊणेतीन कप तांदूळ १/२ कप चणा ड...
https://chakali.blogspot.com/2007/09/masala-dosa.html
Masala Dosa in English
कृती वाचल्यावर त्याखालील टीपा जरून पाहा.
साहित्य :
डोसा
१ कप उडीद डाळ
अडीच ते पाऊणेतीन कप तांदूळ
१/२ कप चणा डाळ
१/२ टिस्पून मेथीदाणे
चवीपुरते मीठ
मसाला
२ उकडलेले मोठे बटाटे
१ मध्यम कांदा, उभा तापळ चिरून
१ टिस्पून उडीद डाळ
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५ ते ६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून किसलेले आले
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद
कृती:
डोसा
१) उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून, ६-७ तास पाण्यात भिजत ठेवावे. उडीद डाळी बरोबरच मेथी दाणे आणि चणा डाळ भिजवावी.
२) नंतर त्यातील पाणी काढून टाकून मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे. तांदूळ वाटताना त्यात १ टिस्पून साखर आणि १ टिस्पून मिठ घालावे. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करावेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ करू नये. मिश्रण चांगले मिळून आले पाहिजे.
३) वरुन झाकण ठेवून १० ते १२ तास मिश्रण आंबू द्यावे. मिश्रण आंबले कि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. याच पिठाच्या इडल्याही करता येतील. म्हणून मिश्रण घट्टसरच ठेवावे. डोसे बनवण्यासाठी आंबलेले पिठातील थोडे पिठ दुसर्या भांड्यात काढावे आणि किंचीत पाणी घालून पातळ करावे.
४) डोसे घालण्यासाठी नॉनस्टीक तवा वापरावा. आमटी वाढायच्या पळीने डोसे नीट घालता येतात.
मसाला/ बटाटा भाजी
१) शिजलेले बटाटे अगदी बारीक चिरून घ्यावे. कांदा बारीक उभा चिरून घ्यावा.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आले घालून फोडणी करावी. त्यात थोडी उडीद डाळ घालावी. मिरच्या बारीक चिरून घालाव्या. कढीपत्ता घालावा.
३) मध्यम आचेवर कांदा परतावा. चिरलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
डोसे गरमागरम सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे.
संबंधित पाककृती:
उडीपी सांबार रेसिपी
दाक्षिणात्य पद्धतीची नारळाची चटणी
हिरव्या रंगाची नारळाची चटणी
टीप:
१) आधी भाजी करून मग डोसे करावेत.
२) डोसे बनवताना तव्यावर तेल नसावे. जर डोसा-पिठ पसरवायच्या आधीच तेल घातले तर पिठ व्यवस्थित तव्यावर पसरत नाही. अशावेळी आधी डोसा पिठ घालून व्यवस्थित पातळ पसरवून घ्यावे. थोडा ब्राऊन रंग दिसला कि मग कडेने तेल सोडावे.
३) डोश्याला आतमध्ये थोडा शेजवान सॉस लावला तर मस्त टेस्ट येते.
४) मेथी दाण्यांमुळे फ्लेवर चांगला येतो. तसेच चणाडाळीमुळे थोडा कुरकूरीतपणा आणि किंचीत पिवळसर रंग येतो.
५) साखरेमुळे पिठ आंबण्याची क्रिया चांगली होते.
६) डोशाचे पिठ आंबण्यासाठी , पिठ बारीक करून उबदार जागी ठेवावे. थंड प्रदेशात डोशाचे पिठ आंबत नाही त्यामुळे ओव्हन २ ते ३ मिनीटे २७५ डीग्री Fahrenheit (१३५ डीग्री Celsius) वर प्रिहीट करावा. २ ते ३ मिनीटांनंतर ओव्हन बंद (स्विच ऑफ) करावा, तसेच जास्तवेळ गरम करू नये. आणि भिजवलेले पिठ झाकण ठेवून ओव्हनमध्ये साधारण १० तास ठेवावे. पिठ आत टाकल्यावर ओव्हनचे दार उघडू नये.
Labels:
Masala Dosa, Dosai recipe

wa! photo ani recipe mastach. 3 vegavegalya chatanyancha photo pahoon tondala pani sutla :). shejwan sauce varun mumbait milanarya chinese doshachi aathawan zali. paticha kanda, gajar ani soya sauce milun bananara mishran ani dosa!
ReplyDeletedhanyavad Nanadan,
ReplyDeletekharach..mumbai madhe khup innovative dishes khayla miltat !!! me suddha khup miss karte chinese doshala !!!! :(
Have you eaten MAsala Dosa at Vashali, FC Road Pune ? My all time favourite
ReplyDeleteho vaishali madhil dosa khalla ahe...wah !!! tondala pani sutle...
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteAajach me dose try kele with your recipe. And they turned out very well...Thanks ! Me tujha blog almost roz follow karte :D Keep giving us recipes for more yummy food :)
dhanyavad Indrayani..
ReplyDeleteFar masta blog aahe, aani te pan marathit.
ReplyDeleteVaishali....yummm
Hi Vaidehi,
ReplyDeleteHope you are doing well !
Mala nehmi Chana Dal ani Harbhara Dal madhe confussion asta. Ithe Chana Dal mhanje apan chivdya madhe ghalto ti dal ka?
Ani urad dal, chana dal, ani methya mix karun bhijat ghalayche ka?
Thank you...
Hi Rohini,
ReplyDeleteमी मजेत..
चिवड्यामध्ये जे वापरतात त्याला डाळं किंवा डाळंवं असे म्हणतात. चणाडाळ म्हणजे जी पुरणपोळीसाठी वापरतो (ड्राय आणि कडक असते).
तिन्ही डाळी (मेथी दाणे, उडीद डाळ, चणा डाळ) एकत्रच करून भिजत घालावे.
Great....
ReplyDeletetumhi khup chan expalin karatat... I think all my search of recipes ends only on Chakali.
tuchya kadun ek chansa recipe book expect karat aahe :)
Lots of Love ... and Cheers !!
धन्यवाद रोहिणी
ReplyDeleteNice blog and photos are also great and looks very tempting.
ReplyDeletethanks monica
ReplyDeletethanks for extra tip
ReplyDeletehii Vaidehi,
ReplyDeleteme indian store madhun dosa flour{dry} anal ahe tu sangu shakashil ka tyapasun dosa kasa banavatat te?
dosa flour chya pakitavar pith kasa bhijavayche te lihile asel bahutek
ReplyDeletenahi na mhanun ter ani te calif made ahe..baghte expe karun
ReplyDeleteHi Renuka
ReplyDeleteme kadhich nahi vaparun pahile.. tyamule idea nahi ga..pan mazya friends na vicharun pahin nakki jar milali recipe tar nakki post karen..
hya recipe madhe tandul sangitle ahet te kuthle vaprave? me regularly basmati vaparte te chaltil ka?
ReplyDeletePriya
hi priya
ReplyDeletekonatehi tandul vaparle tari chaltat..
Hi vaidehi,
ReplyDeleteMla dosa yeto pn to baher milto tasa kurkrit nai hot,to mau hoto. me baryach janan kdun kruti vicharlya, tya saglya sarkhya hotya. Tumchi recipe jara vegli vatli.asha krte tumchi recipe follow karun me chan dosa banavu shaken.
Nisha Jiwarkar.
thanks nisha
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeletetumchi masala dosachi recipe ekadam perfect aahe, mi try keli atishay vyavasthit zale hote.... tumachya saglya recipes ekadam perfect aasatat yat vaadach nahi....thanx a lot for sharing this recipe...god bless u...
leena:)
thanks Leena
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteThank you for such a fantastic blog.mala wicharaycha ahe ki jar mi doshachya pithasathi tandula aiwaji idli rawa waparla tar chalel ka?
Purwa.
Hi Purva,
ReplyDeleteme suggest karen ki Idli rava vaparu nakos dose banavayla.. Me dosa try kela hota Idli rava vaprun teva dosa khup tutat hota... akkha rahat navta..tyamule tandulach vapar.
Hi! Khup chan zala dosa ya recipe prmamane kelyavar. Thanx frm Meghana
ReplyDeleteThanks Meghana
ReplyDeletemi dose kele hote khup chhan jhale
ReplyDeletehi vaidehi,
ReplyDeletedose soft zalele mixture patal asun :(
crispy nahe zale ... plz guide!!!
shweta
Hi Shweta
ReplyDeleteTumhi Chana dal ghatali hotit ka? karan tyamule kurkurit pana yeto.
hi vaidehi,thank you for your great recipes ,mala jevha pasun tuza blog sapdla tevhapasun roj 1 tari dish me tuza blog varun banvate aani te khup uttam hotat, kharach manapasun dhanyavad
ReplyDeletehello vaidehi ,
ReplyDeleteho ghatleli chanadal!!!!
sagale ingredients tu sangilyapramane ghatlele....
shweta
Hi Shweta
ReplyDeletemag kharatar dose kurkurit vhayla pahijet. mau ka zale tyachi kharach kalpana nahi..
Commentsathi dhanyavad
ReplyDeleteag mi udid dal samajun mug dal ghatli :D
ReplyDeleteactually , ghait kalal nahi :(
mummini olakhal :)
sorry tras dilyabadal..
first time kelele tevha really awesm zalele dose ready made peksha chhan :)
shweta
Hi Shweta
ReplyDelete:-D aga tras kahich nahi...ani Thanks ki tu kalavles. mala kalatach navte ki varil pramane dose kele tari kase kay mau zale :)
hii vaidehi,,, aaj masala dosa recipe try keli ,,,kharch khup chan zale hote dose,,,saglyanna avadle,, thank u so much,,, :) Ganesh chaturthi chya tula hardik shubhechcha,, :)
ReplyDeleteThank you Tumhala suddha ganesh chaturthichya shubhechha
ReplyDeleteनमस्कार वैदेही ,
ReplyDeleteमी कालच तू सांगितल्याप्रमाणे मसाला डोसा, बटाटा भाजी आणि सांबर बनविलं . अतिशय रुचकर झाले तिन्ही पदार्थ. माझं नुकतंच लग्न झालं आहे आणि त्यामुळे तुझा ब्लॉग हा माझ्यासाठी अक्षरश: पर्वणीच ठरलेला आहे. तसेच मला नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड देखील आहे.
खरंतर मला आधीदेखील स्वयंपाकाची आवड होती पण तुझ्या रेसिपीस या तुलनेने खरोखरच खूप सोप्या आणि चविष्ट आहेत. मी इतरही पदार्थ या ब्लॉग वरून करून पहिले आहेत. आणि ते उत्तम झाल्याची पावतीही मला नवऱ्याकडून मिळाली आहे.
खरोखर तुझे शतश: धन्यवाद!!
असेच नवनवीन आणि उत्कृष्ट पदार्थ पोस्ट करत रहा.
श्रुती.
धन्यवाद श्रुती :)
ReplyDeleteHi vaidehi tai...
ReplyDeleteHa blog tu kadhich band karu nakos, karan amhi asha lakho gruhini tujhya navin navin recipes karat rahto ani jevha amchya gharatil vyakti te padarth khatat tevha tyanna jo anand hoto to mala vyakt hi karta yet nahiye.. ani jevha pot khush tevha sansar hi khush mhantat.
Ashich amhala sath de...
Chan chan recipes pathavat raha.
Thank you Ashwini :smile:
DeleteHello Vaidehi. Lovely recipes and savior for me. Really appreciate your efforts. Thank you vm. One thing i wanted you to know is your recipes are being plagiarized by : https://www.facebook.com/MARATHIPADARTHAdotCOM?fref=nf
ReplyDeleteI think this is unethical and you should get the deserved mention here..
Thank you very much for informing this. I could identify one recipe (veg khorma) on the above mentioned FB page which has been copied from Chakali blog. Are there any other recipes you have seen on this page? If so, could you please let me know?
DeleteThank you again.
"Masala Dosa" recipe is also taken. There may be many more but i didn't check thoroughly. But I guess they put one once in a while from your blog.
DeleteNice posting!!
ReplyDeleteRecipe karun pahili chan zale dose. Dose pit na ambawata kinwa soda na waparta direct dal tandul watun karta yetiL ka, yet aslyas kase karawe.
ReplyDeletepith jar ambavle nahi tar dose bananar nahit.. mhanje tyala halkepana ajibat yet nahi tasech ambalelya pithacha ek flavor yeto to suddha yet nahi.
Deletetandul bhijavun nuste pole karta yetil
tu varati dilelya dosa recipe madhe ambvtana soda ghalaychi avshkta nahiye ka??
ReplyDeletetu varati dilelya dosa recipe madhe ambvtana soda ghalaychi avshkta nahiye ka??
ReplyDeletenahi..ajibat garaj nahi..
DeleteYa pramanat kiti dose hotil ??
ReplyDeletesadharan 35 madhyam akarache dose hotil
DeleteDosache pith jast aambat zale aahe Kay karave
ReplyDeleteBatter madhye kanda kothimbir barik chirleli mirchi tomato ghalava tyamule ambatpana kami lagel.
ReplyDelete