चकल्या नरम पडण्याची कारणे
भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर - सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे.
मोहन कमी झाले तर - उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात.
चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर तळल्यास - चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात.
चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास - भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी.
चकलीचे पिठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास - अशावेळी थोडी कोरडी भाजणी घालावी. मळून परत चकली करावी.
चकली तेलातून लगेच काढल्यास - चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबूडे येतात नंतर बुडबूडे बंद होवून चकली थोडी खाली बसायला लागेल अशावेळी चकली झाली असे समजावे. त्याआधी चकली तेलातून काढू नये.
चकल्या तेलात घातल्यावर विरघळण्याची कारणे
पिठात मोहन जास्त झाले तर - थोडी भाजणीची उकड काढावी (तेल न घालता), आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात.
चकल्या तुटण्याची कारणे
चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पिठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे - गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचीत मऊ मळावी.
चकली रेसिपीसाठी इथे क्लिक करा.
10 comments
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting Chakali.Your comments are truly valuable!
Please feel free to share your ideas, suggestion, criticism, feedback for my recipes. You can also request a recipe. I'll try to answer you as soon as possible.
If you want to write to me personally, email me at chakalionline@gmail.com.
Subscribe to:
Post Comments (Atom)




वैदेही,
तू खरच ग्रेट आहेस! मी तुझा ब्लॉग नेहमी बघते. तू लिहिलेल्या रेसिपीज खूप सोप्या आणि सुटसुटीत वाटतात. या वर्षी दिवाळीत मी पहिल्यांदा चकली बनवली. ५-६ चकल्या मस्त झाल्या. पुढच्या चकल्या नंतर बनवाव्या म्हणून पीठ झाकून ठेवले. २ तासानंतर चकली करताना तेलात घातली की सुटून येत होती. बरेच प्रयत्न केले तरी जमत नव्हते. तू लिहिलेली वरील कारणे वाचून मी परत उकड काढली, आणि सगळ्या चकल्या मस्त, कुरकुरीत झाल्या.
तुला खूप खूप धन्यवाद एवढ्या Perfect रेसिपीज आम्हाला दिल्याबद्ल आणि खूप खूप शुभेच्छा चकली ब्लॉग साठी!
वर्षा
Hi Varsha,
फार छान वाटले तुझी कमेंट पाहून, धन्यवाद. कशी सेलिब्रेट केली दिवाळी? बाकी काय काय फराळ बनवलास? :)
very nice recipe about chakali.
dhanyavad
namaskar,
tumhi sangitlya prmane chakalichi bhajani keli 1 bhand pithala 2 chamche{ table spoon} mohan ghalun ukad kadhun chkalya kelya pan.... khup telkat zalya plz.yawar upay sanga na ..
manik
namaskar manik,
chakalya talatana kami achevar talalya hotya ka.. tyamule kadachit chakalya telkat zalya astil.
thodi chakalichi bhajani kinva tandalache pith ghalun malalelya pithat ghalavi. laglyas thoda komat panyacha haat gheun malavi ani chakalya karun paha.
I started making chakli but when I put it in oil,
after some time it starts breaking , pls give me the solution??????? why it break into the pieces...
Hello,
If chakalis are melting in the oil then take 1/4 cup chakali bhajani, add salt and red chili powder in small quantity. add very little hot water and knead. Mix it with the dough you have already made. Knead all together and now make chakali. you should be able to make chakali without any problem.
mi aaj punha chakali karun pahili...tumhi sangitalya pramane keli...apratim....dhanyawaad...
Thanks Supriya