नारळाची चटणी - Coconut Chutney
Coconut Chutney in English वेळ: ५ मिनीटे साधारण १ कप साहित्य: १ कप ताजा खवलेला नारळ १/४ कप चण्याचं डाळं चवीपुरते मिठ १/४ टिस्पून साख...
https://chakali.blogspot.com/2009/07/south-indian-coconut-chutney.html
Coconut Chutney in English
वेळ: ५ मिनीटे
साधारण १ कप
साहित्य:
१ कप ताजा खवलेला नारळ
१/४ कप चण्याचं डाळं
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून साखर
१ हिरवी मिरची
फोडणीसाठी
१/२ टिस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी
१/२ टिस्पून उडीद डाळ
१/८ टिस्पून हिंग
५ ते ७ कढीपत्ता पाने
१ सुकी लाल मिरची
१/८ आले पेस्ट
कृती:
१) नारळ, डाळं, हिरवी मिरची, मिठ आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात गरजेपुरते पाणी घालून एकजीव वाटून घ्या. हे मिश्रण एका लहान वाडग्यात काढावे.
२) कढले गरम करून त्यात तेल घालावे. तेल तापले कि त्यात मोहोरी आणि उडीद डाळ घाला. उडीद डाळ लालसर झाली कि हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, आणि आलेपेस्ट घालून फोडणी करून घ्या. हे मिश्रण नारळाच्या मिश्रणावर घाला. मिक्स करून हि चटणी इडली, मेदू वडा, मसाला डोसा, उत्तपा, आप्पे आणि इतर दाक्षिणात्य पदार्थांबरोबर सर्व्ह करा.
टीप:
१) वरील चटणीची रेसिपी उडीपी हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीची आहे. आपल्या आवडीनुसार यामध्ये चिंच, लिंबू, दही, जिरे असे आवडीप्रमाणे घालावे.
२) चटणी प्रकार २
Labels:
coconut chutney, South Indian Chutney
वेळ: ५ मिनीटे
साधारण १ कप
साहित्य:
१ कप ताजा खवलेला नारळ
१/४ कप चण्याचं डाळं
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून साखर
१ हिरवी मिरची
फोडणीसाठी
१/२ टिस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी
१/२ टिस्पून उडीद डाळ
१/८ टिस्पून हिंग
५ ते ७ कढीपत्ता पाने
१ सुकी लाल मिरची
१/८ आले पेस्ट
कृती:
१) नारळ, डाळं, हिरवी मिरची, मिठ आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात गरजेपुरते पाणी घालून एकजीव वाटून घ्या. हे मिश्रण एका लहान वाडग्यात काढावे.
२) कढले गरम करून त्यात तेल घालावे. तेल तापले कि त्यात मोहोरी आणि उडीद डाळ घाला. उडीद डाळ लालसर झाली कि हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, आणि आलेपेस्ट घालून फोडणी करून घ्या. हे मिश्रण नारळाच्या मिश्रणावर घाला. मिक्स करून हि चटणी इडली, मेदू वडा, मसाला डोसा, उत्तपा, आप्पे आणि इतर दाक्षिणात्य पदार्थांबरोबर सर्व्ह करा.
टीप:
१) वरील चटणीची रेसिपी उडीपी हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीची आहे. आपल्या आवडीनुसार यामध्ये चिंच, लिंबू, दही, जिरे असे आवडीप्रमाणे घालावे.
२) चटणी प्रकार २
Labels:
coconut chutney, South Indian Chutney
..अहो, तुम्ही हे सगळ्या चटण्यांमधे साखर काय घालायला सांगता हो? ऑथेंटिक दक्षिण भारतिय रेसिपी मधे साखर किंवा गुळ ( सांबार किंवा चटणी मधे ) वापरत नाहीत.
ReplyDeleteमला कसं माहिती म्हणतां?? अहो माझा एक रुम मेट होता ना कॉलेज मधे असतांना दोन वर्षं... असो.. तुमचा ब्लॉग छान आहे, नेहेमी वाचतो, पण कॉमेंट आजंच टाकतोय..
नमस्कार महेंद्र,
ReplyDeleteकमेंटसाठी धन्यवाद
ऑथेंटिक दक्षिण भारतीय पदार्थांत (सांबार किंवा चटणीमध्ये) साखर किंवा गुळ वापरत नाहीत, हे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण, दक्षिण भारतातसुद्धा तामिळ, आंध्र, उडीपी, केरळी अशा बर्याच पद्धतींचा समावेश आहे. आंध्रमध्ये गुळ किंवा साखर फारशी दिसत नाही पण उडीपी सांबारात किंवा चटणीत गूळ किंवा साखर असते. आणि रेसिपी ऑथेंटिक होण्यापेक्षासुद्धा ती आपल्या चवीला सुटेबल करण्याकडे माझा कल जास्त असतो. तुम्हीपण चटणीमध्ये थोडी साखर घालून पाहा, उडीपी हॉटेलमध्ये जशी चटणी मिळते तशीच छान चटणी होते. आणि समजा तुम्हाला अगदीच आवडत नसेल तर नारळाची चटणी गोड चवीशिवाय चविष्ट लागतेच.
Typically we also put some jeera, tamarind and some curd while grinding the coconut. The tamarind really adds to the sour flavour of the chutney, especially with idlis.
ReplyDeleteHi Vaidehi, KHup chan vatale marathi recipes vachun.. Mazya sasubai pan khush ahet marathi vachata yete he baghu.
ReplyDeleteEk suggestion ahe. Jeva TOP Navigation var click karato teva navin browser window open hote and then you cannot go back. Is it by purpose?
Page HTML madhe tasach code ahe.
Mala vatale ki tyach windowt pan open zale tar jast chanagle hoil.Just a suggestion.
Prachi
Hi Prachi
ReplyDeletecommentsathi khup thanks, vachun bare vatle ki tumchya sasubainna marathi blog avadla te..
tumche suggestion lakshat ghetle ahe ani tantrik sudharana kartana me yacha nakki vichar karen
Hi Vaidehi,
ReplyDeleteThis saturday i am planning to cook this chutney.
Small party at my place. As u know very well, i am new in cooking. i could not able to understand what do u mean by 1/4 chanyach dala? is this our regular chanyach dal(Harbarachi dal) ka?, and 1/4 mhanje 1/4th cup ka?
Hi Rohini
ReplyDeleteaga chukun '1/4 cup' lihayla visarle hote..ata correct kele ahe.. thanks lakshat anun dilyabaddal. ani 1/4 cup mhanjech 1/4th cup.
रेग्युलर चणा डाळ नाही चिवड्यात घालतो ते चण्याचं डाळं घाल.
Chutney kharach khuuupppp tasty hote.
ReplyDelete(me farach late compliment dili nahi ka ....:))
tumchya sagalya recipe khup cchan aahet..ani mazya aaishi khup same aahet tyamule mala tumcha blog khup aavdto
ReplyDeletedaali bheejavun theyvaychya kaa.Pls laukar reply dya.
ReplyDeletehi
ReplyDeletedali bhijavaychya nahit,
chanache dal mhanje bhajlele dal aste je chivadyat vaparto te ....direct vaprayche
tasech udud dal bhijavaychi garaj nahi ... direct fodnit vapravi
tumhi gulabjam madhe maida ghalayla sangitla aahe, pan kahi jan rawa vaprtat, tar tyache praman sangla ka? ani rawa vaprla tar chavit kahi farak padto ka?
ReplyDeleteme ataparyant kadhi rava ghalun kelele nahiye gulabjam.. pan me khaun pahile ahet.. chav changali lagte.. maidyapeksha thoda kami ghalava rava.. karan bhijavlyavar to fugto..
ReplyDeletemast bogs astat tumche. mi nehmi refer karte ani it works. tips pan khup useful astaat.
ReplyDeleteya chatnit hirwi mirchi ghatli tar chalel ka?
dhanyavad,
ReplyDeleteya chatanit hirvi mirchich vaparaychi aste..
hmmm nice recipe.. ya and we use jaggery in sambhar.. it depends basically but ya we dont use sugar but jaggery is must.. then again it depends on which community you belongs to.. I am Vaishnawa brahmin from Karnataka..
ReplyDeleteThank you Vaidehi. Masttttt Recipies
ReplyDeleteKhupch chan aahe Recipe.... Thank you vaidehi
ReplyDeleteखरचं खूप छान रेसिपी अाहे. मी try केली. मस्त झाली होती.
ReplyDeleteThank you vaidehi..
Vaishali
Thanks
DeletePandharpuri Dal Sanga Mhnaje Sanjel Saglyana
DeletePandahrpuri Dal Sanga Mhanje Samjel Saglyana
ReplyDeleteनमस्कार ....मला कहिहि नविन करायच असल कि मी तुमचा ब्लोग पाहाते .....आणी सगळ्या रेसिपी उत्तम होतात....मला कुकिग मधे फरसा रस नाही....पन लग्ना नतर करते आहे...धन्यवाद.....
ReplyDelete