बेक्ड करंजी - Baked Karanji
Dryfruit Karanji (baked) in English ३० ते ३५ लहान करंज्या वेळ: ५० मिनीटे (सारण तयार असल्यास) संबंधित पाककृती:- ओल्या नारळाच्या करंज्या...
https://chakali.blogspot.com/2009/10/baked-karanji-diwali-faral.html
Dryfruit Karanji (baked) in English
३० ते ३५ लहान करंज्या
वेळ: ५० मिनीटे (सारण तयार असल्यास)
संबंधित पाककृती:-
ओल्या नारळाच्या करंज्या **** दिवाळी फराळ **** मेथी शंकरपाळे **** मटार बटाटा करंजी
साहित्य:
२ कप मैदा
३ टेस्पून तूप, पातळ
चिमूटभर मिठ
ड्रायफ्रुटचे सारण
दुध, पिठ भिजवण्यापुरते
स्टेप बाय स्टेप फोटोनुसार प्रेझेंटेशनसाठी इथे क्लिक करा.
कृती:
१) मैदयात तूप आणि मिठ घालून तूप सर्व मैद्याला चोळून घ्यावे. दुध घालून मध्यमसर कणिक मळून घ्यावी. १५ मिनीटे झाकून ठेवावी.
२) कणिक २५ ते ३० समान छोटे गोळे करून घ्यावे. गोळा साधारण १ इंचाचा तरी असावा.
३) गोळा लाटून गोल पुरी करावी. मध्यभागी १ टेस्पून ड्रायफ्रुटचे सारण घालावे. अर्ध्या गोलाच्या कडेवर थोडे पाणी लावावे. दुसरी बाजू दुमडून पाणी लावलेल्या कडेवर आणावी. कडा चिकटवून घ्याव्यात. काटा-चमच्यातील काट्याने कडेवर डिझाईन बनवावे आणि कातणाने १/२ सेमी जागा सोडून कड कापावी. कापलेली पट्टी पुन्हा कणकेत मिक्स करावी किंवा ३ ते ४ करंज्या केल्यावर त्यांच्या पट्ट्या एकत्र करून नवी करंजी बनवावी.
४) सर्व करंज्या बनवून घ्याव्यात. सर्व बाजूनी तूपाचा हलकासा हात फिरवावा. बेकिंग ट्रेमध्ये अल्युमिनम फॉईल पसरवून त्यावर करंज्या अरेंज कराव्यात.
५) ओव्हन २७५ F वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट झाल्या कि ४० ते ४५ मिनीटे बेक करावे.
खुप जास्तवेळ बेक करू नये. यामुळे छान ब्राऊन रंग येईल, पण आत भरलेले सारण जळेल.
टीप:
१) या जरी बेक केलेल्या करंज्या असल्या तरी पूर्ण डाएट करंज्या नाहीत, कारण पिठात आपण थोडे तूप घातले आहे. जर तूप घातले नाही तर करंज्या खुपच ड्राय होतात. आणि पटकन जळतात. म्हणून यामध्ये जे तळतानाचे तेल करंजीत शोषले जाते ते अवॉइड होते.
Labels:
Baked Karanji, Baked Gujiya, Diwali Recipes, Diwali Faral

शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर २००९, सायंकाळी ५ वाजून १६ मिनीटांनी, सॅन फ्रांसिस्को, कॅलिफॉर्निया येथून कमेंट आली होती. पण ती कमेंट अनॉनिमस असल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने त्या कमेंटविषयी मी काहीच करू शकले नाही. तेव्हा, जर अधिक माहिती द्यायची असेल तर chakalionline@gmail.com ला संपर्क साधा.
ReplyDeleteHi recipe tar khup chan aahe. Suke khibare - sakhar vagareche saran vaparale tar calen kaa.
ReplyDeleteHi
ReplyDeletethanks for your comment.. ho suke khobre ani sakhareche saranahi chalel tasech khirapat banavunsuddha karanji banavta yete
Khirapat recipe
Hiee Vaidehi....
ReplyDeletemi saata laun kelya karanjya... khupach khuskhushit zalya.. ani olya naralacha saran kela..
tuzya diwali chya farala chya recipes chhan aahet :-)
Hi Maithili
ReplyDeletecommentsathi khup thanks .and nice idea..chan lagle asel olya naralache saran!! mastach..
Hi Vaidehi,
ReplyDeletemala mesur paka chya vadya ani sonpapdi chi recipe pahije hoti tula thauk aslys sangshil ka please?
Prakash
mazyakade combi microwave oven ahe. tar bake karayche asel tar kontya mode war karayche aste? tasech saatyachya karanji chi recipe milel ka? thankyou
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteBaked Karanji cha majha bet phasla changlach.... the karanji were left almost white and were stone textured.
Khava saran was very well ... thanks
Next time Karanjiche cover madhye thode ajun toop ghal mhanje jast khuskhushit hotil..
ReplyDeleteNamaskar..mi combi microwave oven kadhi vaparle nahiye.. tyamule tyat kase bake karayche yavishayi kalpana nahi..pan jar kahi mahiti milali tar nakki lihen
ReplyDeletehello ,
ReplyDeletefor baking in combo micro go for convection it will give u better result but have to checked in maen while after 2 to 3 min.
Hi mazyakade otg aahe so baking tray top, middle or bottom rack var theu ani mode toast ka bake set karu
ReplyDeletetry middle la theva ani baking var theva
Delete