टोफू चटपटा - Chatpata Tofu
Tofu Chatpata in English वेळ: १५ ते २० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: २०० ग्राम टोफू २ टिस्पून आलेलसूण पेस्ट १ मध्यम टॉमेटो, बा...
https://chakali.blogspot.com/2013/07/chatpata-tofu.html?m=0
Tofu Chatpata in English
वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
२०० ग्राम टोफू
२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१ मध्यम टॉमेटो, बारीक चिरून
२ मध्यम कांदे, मोठे तुकडे (पाकळ्या विलग कराव्यात)
१ मध्यम भोपळी मिरची, मध्यम तुकडे
१/२ कप कोथिंबीर, बारीक चिरून
२ टेस्पून पुदिना, बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२ टेस्पून बेदाणे
१ टिस्पून गरम मसाला
१ टिस्पून चाट मसाला
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१ + २ टिस्पून तेल
चवीपुरते मीठ
कृती:
१) टोफूचे मध्यम तुकडे करावेत. कॉर्न फ्लोअर आणि थोडेसे मिठ घालून मिक्स करावे. त्यात टोफूचे तुकडे घालून टॉस करावे. नॉनस्टीक तवा घेवून त्यावर १ चमचा तेल पसरावे. तवा मंद आचेवर गरम करावा. त्यावर टोफू अरेंज करून सर्व बाजू थोडाशा क्रिस्पी आणि लालसर होईस्तोवर परतावे. त्यावर गरम मसाला आणि चाट मसाला भुरभुरावा.
२) कढईत २ टिस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि मिरची परतावी. त्यात कोथिंबीर, पुदिना आणि कांदा घालून मिनिटभर परतावे. नंतर भोपळी मिरची घालून मिनिटभर परतावे.
३) टॉमेटो घालून ते मऊ होईस्तोवर परतावे. आता बेदाणे आणि रोस्ट केलेले टोफुचे तुकडे घालावे. नीट मिक्स करावे. दोनेक मिनिटे परतावे. परतल्याने बेदाण्यातील गोडवा बाहेर पडतो.
तयार टोफू चटपटा गरमागरम सर्व्ह करावे.

Hi
ReplyDeleteI think you forgot to mention about Tomato in your ingredients (sahitya)
Please let us know how much do we need for this recipe.
Its really nice recipe.
Thank you,
Priyanka Mogal
Hi Priyanka
ReplyDelete1 madhyam tomato puresa hoto.
hhmmm...
ReplyDeleteyummy i like this
Hi Vaidehi,
ReplyDeleteCan you pls let me know what is exactly tofu? I am confuse in the same. Is it Paneer only or something different. & if it is different where can I get the same in Mumbai.
BTW I am really big fan of your recipes.
Thanks & Best Regards,
Rupali.
Hi Rupali
DeleteTofu means bean curd and made of Soya milk.
It is available in supermarkets like reliance fresh, More, Dmart, Big bazaar etc.
Hi,
ReplyDeleteMasta aahe recipe.
Thank you
Delete