Kadha for cough and cold
४-५ दिवसापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यावर आईंनी एक काढा करून दिला. त्यामुळे सर्दी-खोकला ऑलमोस्ट बरा झाला. सध्या पावसाळी हवा असल्...
https://chakali.blogspot.com/2013/07/kadha-for-cough-and-cold.html?m=0
४-५ दिवसापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यावर आईंनी एक काढा करून दिला. त्यामुळे सर्दी-खोकला ऑलमोस्ट बरा झाला. सध्या पावसाळी हवा असल्याने सर्दी-खोकला-ताप बऱ्याच जणांना होतो. ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली.
साहित्य:
६ चहाचे कप पाणी
१ इंच ज्येष्ठीमध
१ इंच सुंठ
१ इंच वेखंड
१०-१५ तुळशीची पाने
४ लांब पाती, चहा पाती (गवती चहा) (लेमनग्रास)
४ लवंग
२ इंच दालचिनी
५ पारिजातकाची पाने (टीप)
१/४ कप धने (साधारण मुठभर)
४-५ पत्री खडीसाखर
कृती:
१) धने भरडसर कुटून घ्यावे. पावडर होवू देऊ नये. चहा पाती लहान आकारात कापून घ्याव्यात. सुंठ आणि वेखंडावर बत्त्याने एकदाच हलकेच ठोकावे.
२) खडीसाखर सोडून सर्व साहित्य पाण्यात घालावे आणि उकळत ठेवावे. ६ कपचा ४ कप काढा होईस्तोवर उकळवा. नंतर गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवावे.
३) ५ मिनिटांनी गाळून घ्यावा. त्यात खडीसाखर घालावी. तेवढ्या उष्णतेवर खडीसाखर विरघळेल.
काढा गरमच प्यावा. काढा एकावेळी १/२ कप असे दिवसातून २-३ वेळा प्यावा. उरलेला काढा फ्रीजमध्ये झाकून ठेवावा. लागेल तसा गरम करून प्यावा.
टीप:
१) ज्यांची उष्ण प्रकृती असेल किंवा उष्णतेचा खोकला असेल तर हा काढा कमी प्रमाणात प्यावा. तसेच थोडी हिरवी वेलची कुटून इतर साहित्याबरोबर उकळवावी.
२) प्राजक्ताची पाने मिळाली नाहीत तरी चालेल. पारिजातकाच्या पानांमुळे सर्दीमुळे तापाची जी कणकण वाटते ती कमी व्हायला मदत होते.
३) सुंठ न मिळाल्यास आलं वापरले तरी चालेल.
४) अडुळसा पाने मिळाल्यास ४ पाने किंवा पावडर मिळाल्यास १/२ चमचा पावडर घालावी.

अगदी हा आणि असाच (सर्व प्रमाण तसेच) माझी आई मला लहानपणी करून द्यायची, आता मी माझ्या मुलांना देते.
ReplyDeleteतुळस नसेल तर बेसिल ची पानेहि चालतात, आणि ह्यात पिंपळी, जवस(flex seeds) घातल्यास अजून चांगला इफेक्ट येतो.
धन्यवाद धनलक्ष्मी
ReplyDelete