गुळपोळी - gulpoli
Gulpoli in English वेळ: साधारण २ तास नग: जवळपास २५ मध्यम गुळपोळ्या
https://chakali.blogspot.com/2010/12/gulpoli-makar-sankrant.html?m=0
Gulpoli in English
वेळ: साधारण २ तास
नग: जवळपास २५ मध्यम गुळपोळ्या
साहित्य:
सारणासाठी
१/२ किलो गूळ
१ कप बेसन
२ सुक्या नारळाच्या वाट्या
३/४ कप तिळ
१/२ कप शेंगदाणे
१/२ कप खसखस
१/२ कप तेल
आवरणासाठी
दिड कप मैदा
३/४ कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
२ टेस्पून बेसन (ऐच्छिक)
कृती:
१) सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईस्तोवर कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे. कमी असल्यास अजून थोडं खोबरं भाजून चुरा करावा.
२) तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
३) शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकावीत आणि एकदम बारीक कूट करून घ्यावा.
४) एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात १/२ कप तेल गरम करावे. त्यात १ कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
५) गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
६) मैदा, कणिक, मिठ आणि बेसन (ऐच्छिक) एकत्र करावे. २ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधं तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवणे.
७) सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
८) आवरणासाठी आपल्याला "१ सारण गोळ्याला २ पिठाचे गोळे" हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
९) २ पिठाच्या लाटयांमध्ये १ सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
१०) मिडीयम हाय हिटवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.
टीप्स:
१) पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.

Thanks for posting this recipe.Btw,mala 'apple kheer' chi recipe havi hoti,can u pls post it.
ReplyDeleteThanks,Meenal.
hi,
ReplyDeleteगुळपोळीत पहिल्यांदाच सुके खोबरे वापरलेले पाहिले. पण त्याच्या चुर्यामुळे पोळी फुटणार नाही ना? आणि शेवटच्या वाक्यात तुला 'तूप' घालून खावी असे लिहायचे होते ना? तो शब्द राहून गेलाय बहुतेक. तिळ्गूळ वड्या कशा करायच्या त्याची पण कृती दिलीस तर बरे होईल.
hi Anjali
ReplyDeleteहो खुप खमंग लागते. सुके खोबरे फक्त खमंग भाजावे आणि हाताने चांगले चुरू घ्यावे. आणि त्याने नाही फुटात पोळी.. ट्राय करून पाहा. आणि तूपाचे करेक्शन सांगितल्याबद्दल Thanks
तिळाच्या वड्या आणि इतर संक्रांत स्पेशल रेसिपीसाठी इथे क्लिक कर
धन्यवाद....या संक्रांतीला ह्या पद्धतीने करून पाहते पोळी आणि वड्या..
ReplyDeletethanks
ReplyDeletemajha ek prashna asa aahe, ki me sagli pitha neet mojun ghete, telacha mohan pan vyavashtit asta, tari pan poli latun tavyavar takli ki gul baher yeto..asa ka hota?
ReplyDeletePls. sangu shaksheel ka?
hi
ReplyDeletepolya madhyam achevar bhajun paha.. kadachit tava jast tapla asel mhanun baher yet asel.. tasech halkya hatane lata ani poli ulatatana kalatha lagun poli fatu naye yachi kalji ghya
gulpoli gar zalya nantar kadak hote. ti naram rahavi yasathi kay karave.
ReplyDeletefrom
Ambika
hi kahijananchya polya agadi papadasarakhya patal hotat tya kashya karayachya?
ReplyDeleteDear Vaidehi,
ReplyDeleteI am going to try this recipe tomorrow. This is my very first attempt, I and my hubby both love it and were missing it a lot. Thank you so much for such a detailed recipe and for being so generous with your knowledge to share it with all of us. 'Chakali' has become the 'Ruchira' of today's times and for the next generation. I find myself visiting your site for trustworthy recipes everytime and I am never disappointed.
Wishing you and your family a very happy new year and Happy Sankrant!
Warm Regards,
Priti
Thanks Priti
ReplyDeleteHappy Makar sankrant to you and your family
saran ekdam mausar malale gele pahije.. saran ghattasar asale ki poli latatana atmadhye nit pasarat nahi mag poli jaad rahte..
ReplyDeleteHello Ambika
ReplyDeletegulpolya kadakach astat.. tya naram changlaya lagat nahit..
hi Vaidehi me dombivli madhe rahate,tuzya recipes follow karte,it's really helpful!
DeleteThank for writing comment :smile:
DeleteDear Vaidehi,
ReplyDeleteWe just had Gul Polis this morning for breakfast. They turned out amazing! Thanks a lot! The 'saran' was perfectly sweet and so delicious with all the roasted ingredients. I didnt have dry coconut at home so had to skip it, still we loved every bite of the gul poli. I got lots of praises from hubby and also my in-laws who were overjoyed that I tried these and they were a success. Thank you so much! :)
Warm Regards,
Priti
Thanks Priti..
ReplyDeleteHi hya polya kiti divas tiku shaktat
ReplyDeleteHi Arpita
Deleteya polya 8 te 10 divas sahaj tiktat.
Namaskar
ReplyDeleteSankratichya Hardik Shubheccha
mi hi recipe try keli polya changlya zalya
pan mala jara guide karal ka? ---
1. Saran ghattasar malave ase sangitaley
pan maze saran korade zale hote tyala malun gheta yet navhate
mhanun mi tyat 1Tbsp tel garam karun ghatle tarihi milun yeina shevti mi pani ghatle
te jast zale saran patal zale mhanun mi thode besan telat bhajun mix kele
tenvha te ghattasar malane shakya zale
polya latata alya chan bhajlya gelya (pan tarihi mala yogya method ne punha try karayachya ahet )
2.1/2 cup telat besan bhajun ghyayache ahe ethe tela aivaji sajuk toop vaparata yeil ka?
pls reply kara
Thank you
Namaskar
DeleteSaran banavtana til ani khobre khamang bhajave. va mixer madhye bareek kartana tel sutate.
Gool baryachda kadak ani korda asto. ashaveli jara mau gool ghyava jo sahaj chirala jail. mhanje dukandarala sangatanaach tase sangave ki gulpoli sathi gool hava ahe. yamule suddha farak padto.
besan telatach bhajave. toopat bhajalyas mishran gaar zale ki toop thijate. ankhi ghatta hote.
Mishranat jar pani ghatle asel tar polya karun takavyat karan he mishran tikau honar nahi.
mala tel pulichi receipe dya please
DeleteHi Vaidehi,
ReplyDeleteMala 10-12 ch gulachya polya karaychya aahet, tyasathi please saranache praman sangshil ka?
वैदेही,
ReplyDeleteआत्ता रेयिपी वाचली. माझी आजी सुरेख गूळपोळी करायची. आता तू सांगितल्यानुसार मी पण करून पाहीऩ फक्त थोड्याच आधी करून बघायच्या आहेत़़ तर बरोबर याच्या निम्नं साहित्य घेऊ का?
ho chalel.
Deletekhaskhas aradha Cup? Mala anubhav nahi faarsa swaypakacha mhanun ha adnyani prashna. ardha cup hi chuk nahiye na?
ReplyDeletenahi.. tevdhi lagte..tyachi praman kami jast karu shakto..
Deleteसारणात भाजलेले बेसन घालायचे आणि पीठ मळताना पण घालावे का? किती?
ReplyDeletenahi je bhajlele besan ahe tech ghalayche.. vegle ajun besan ghalave lagat nahi.
Delete