लुंग फुंग सूप - Lung Fung soup
Lung Fung Soup in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ६ कप व्हेजिटेबल स्टॉक ४ बेबी कॉर्न, थोडे जाडसर तिरके काप १ मध्...
https://chakali.blogspot.com/2013/05/lung-fung-soup.html?m=0
Lung Fung Soup in English
वेळ: २० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
६ कप व्हेजिटेबल स्टॉक
४ बेबी कॉर्न, थोडे जाडसर तिरके काप
१ मध्यम गाजर, पातळ तिरके काप
१ लहान भोपळी मिरची, चिरलेली (१ सेमीचे तुकडे)
६ ते ८ मश्रुम्स, उभे मध्यम काप
१ टीस्पून तेल
१/२ टीस्पून आले, बारीक चिरून
६ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ टीस्पून व्हिनेगर
दीड टीस्पून सोया सॉस
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
चवीपुरते मीठ
३ चिमटी मिरपूड
४ टेस्पून पातीकांद्याची पात
कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर लसूण परतावे. गाजर आणि बेबी कॉर्न घालून मोठ्या आचेवर मिनिटभर परतावे. नंतर भोपळी मिरची, मश्रुम्स, सोया सॉस आणि मीठ घालावे. ३०-४० सेकंद परतावे.
२) १/२ कप स्टॉक बाजूला ठेवून बाकी स्टॉक घालून ३-४ मिनिटे उकळावे. उकळी फुटली की १/२ कप स्टॉकमध्ये कॉर्न फ्लोअर मिक्स करावे आणि कढईत घालावे. दाटपणा आलं की एखाद मिनिट उकळू द्यावे.
३) शेवटी व्हिनेगर, पातीकांदा आणि मिरपूड घालून ढवळावे आणि सर्व्ह करावे.
टीपा:
१) तेल वापरल्याने सूपवर तेलाचा पातळ तवंग दिसतो. ते टाळायचे असल्यास तेल वापरू नये. भाज्या व्हेजिटेबल स्टॉक मध्य उकळवाव्यात.
२) जर व्हेजिटेबल स्टॉक नसेल तर नुसते पाणी वापरावे. चवीसाठी १/२ क्युब मॅगी मॅजिक मसाला वापरावा. यामुळे चव छान येते.
३) जर अंडे चालत असेल तर २ अंडी फोडून फेटून घ्यावी. सूप तयार झाल्यावर गॅस बंद करायच्या १-२ मिनिटे आधी फेटलेले अंडे घालावे. वर तरंगायला लागले की गॅस बंद करावा आणि सर्व्ह करावे.