कोथिंबिरीचा झुणका - Kothimbiricha Zunka

Kothimbir Zunka in English वेळ: १०-१५ मिनिटे वाढणी: ३-४ जणांसाठी साहित्य: ३/४ कप बेसन + ३/४ कप पाणी (मिक्स करावे, गुठळ्या मोडून घ्य...

Kothimbir Zunka in English

वेळ: १०-१५ मिनिटे
वाढणी: ३-४ जणांसाठी


साहित्य:
३/४ कप बेसन + ३/४ कप पाणी (मिक्स करावे, गुठळ्या मोडून घ्याव्यात.)
२-३ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
७-८ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून
१ मोठा कांदा, बारीक चिरून
३-४ हिरव्या मिरच्या (मध्यम तिखट)
१/२ कप चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ

कृती:
१) बेसनचे मिश्रण तयार ठेवा. त्यात मीठ घालून चव पहा.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालून लालसर परतावी. नंतर मोहोरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून परतावे. कांदा लालसर होईस्तोवर परतावे.
३) कांदा छान परतला गेला की त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. १५-२० सेकंद परतावे. आच मंद करून भिजवलेले बेसन घालावे. सारखे ढवळावे. गुठळ्या होवू देऊ नयेत.
कढईवर झाकण ठेवून बेसन मंद आचेवर शिजू द्यावे. मध्येमध्ये ढवळावे म्हणजे करपणार नाही. साधारण ५-८ मिनिटात झुणका तयार होईल. शिजलेला झुणक्याचा रंग लगेच कळून येईल.
गरम झुणका भाकरी किंवा पोळीबरोबर वाढावा.

टीप:
१) झुणक्यासाठी थोडे जास्त तेल लागते. तेल कमी घातल्यास झुणका मोकळा होणार नाही.

Related

Marathi 7697546511778040185

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item