Boondi Ladu
Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुं...

वेळ: ३० ते ४० मिनीटे
वाढणी: ८ मध्यम लाडू
साहित्य:
१ कप बेसन
१ कप साखर
वेलची पूड
केशर
तळण्यासाठी तूप किंवा तेल
बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे
कृती:
१) बेसनात १ चमचा तूप घालावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. पीठ घट्टही नको आणि पातळसुद्धा नको. गुठळ्या राहू देउ नयेत.
२) कढईत तूप गरम करून आच मध्यम ठेवावी.
३) कढईवर झारा धरून भिजवलेल्या पीठातील थोडे पीठ घालावे. बुंदी पाडाव्यात. बुंदी तळल्या गेल्या कि दुसऱ्या झाऱ्याने बुंदी तूपातून काढाव्यात. पेपरवर काढाव्यात.
४) झाऱ्यावर लागलेले पीठ हाताने साफ करून झारा धुवून पुसून घ्यावा. परत तीच कृती करून सर्व बुंदी तळून घ्याव्यात.
५) साखरेमध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक बनवावा. पाकात वेलची केशर घालावे. पाकात बुंदी घालून ढवळावे. मिश्रण अधून मधून ढवळावे. पाक शोषला गेला कि लाडू वळावेत.