सुरणाची ताकातली भाजी - Suran Bhaji

Suran Bhaji in English वेळ: १५-२० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: १/४ किलो सुरण फोडणीसाठी - १ टिस्पून तूप, १/४ टिस्पून जिरे ४-५ ...

Suran Bhaji in English


वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी


साहित्य:
१/४ किलो सुरण
फोडणीसाठी - १ टिस्पून तूप, १/४ टिस्पून जिरे
४-५ कढीपत्ता पाने (उपास असल्यास वापरू नये)
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१ टेस्पून ताजा खवलेला नारळ
चवीपुरते मिठ
१/२ कप ताक

कृती:
१) सुरण सोलून घ्यावे. सोलताना हाताला तेल लावून सोलावे. आतील भागाचे मध्यम चौकोनी तुकडे करावे. कुकरमध्ये २-३ शिट्या करून शिजवून घ्यावा. शिजवताना चिंच किंवा कोकम घालावे म्हणजे सुरणाचे खाजरेपण निघून जाते.
२) कढईत तूप गरम करून जिरे, कढीपत्ता, आणि मिरची घालून फोडणी करावी. शिजवलेला सुरण आणि मिठ घालावे. ताक घालून सुरण झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावा. नंतर नारळ आणि  दाण्याचा कूट घालून थोडावेळ उकळी काढावी.
चव पाहून मिठ तिखट लागेल तसे वाढवावे. थोडी साखरही घालावी.
गरमागरम सर्व्ह करावी.

टीप:
१) सुरण हाताने चिरल्यास हाताला खाज सुटू शकते. तसेच चिंच-आमसूल न घालता शिजवलेला सुरण खाल्ल्याने जिभेला आणि घशाला खाजतं. म्हणून सुरण चिरताना हाताला तेल लावावे. आणि कुकरमध्ये शिजवताना त्यात थोडी चिंच किंवा आमसूल घालावे. आंबटपणामुले खाजरेपण कमी होते.


Nutritional Info: (per serving) (Considering 3 servings) 
Calories: 144 | Carbs: 24 g | Fat: 4 g | Protein: 2 g | Sat. Fat: 3 g | Sugar: 0 g

Related

Suran 3686249078361080215

Post a Comment Default Comments


  1. कूकरमध्ये सुरण शिजवताना पाणी घालायचे का ?

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item