हेल्थी मंचुरीयन - Healthy Manchurian
Healthy Manchurian in English वेळ: ४५ ते ५० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: मंचुरियन बॉल्स:::: ३ टेस्पून मुग ३ टेस्पून मटकी २ ...
https://chakali.blogspot.com/2014/09/manchurian-delight.html?m=0
Healthy Manchurian in English
वेळ: ४५ ते ५० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
मंचुरियन बॉल्स::::
३ टेस्पून मुग
३ टेस्पून मटकी
२ टेस्पून मसूर
८-१० लसूण पाकळ्या
१ इंच आल्याचा तुकडा
२ हिरव्या मिरच्या
१/४ कप सिमला मिरची, बारीक चिरून
३ टेस्पून किसलेले गाजर
१/४ कप किसलेला कोबी (किसणीची जाड बाजू)
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
व्हेजिटेबल बेड::::
१ टेस्पून तेल
१ लहान कांदा, बारीक चिरून
दिड टेस्पून आलेलसूण, बारीक चिरून
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
३/४ कप कोबी, पातळ उभे काप
१/४ कप गाजर, पातळ काप
१/२ कप सिमला मिरची, पातळ काप
२ ते ३ टेस्पून हॉट अँड स्वीट टॉमेटो केचप
२ ते ३ टिस्पून सॉय सॉस
१ टिस्पून चिली सॉस
२ चिमटी साखर
चवीपुरते मीठ
इतर साहित्य::::
१ टिस्पून सॉय सॉस
२ टेस्पून टॉमेटो केचप
१ टिस्पून ग्रीन चिली सॉस
१ टिस्पून तेल
१ टिस्पून लसूण, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
कृती:
१) मुग, मटकी, मसूर ८-१० तास भिजत घालावे. नंतर पाणी काढून टाकावे. भिजलेले कडधान्य निवडून त्यातील कडक राहिलेली कडधान्य आणि बारीक खडे काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून ऊबदार ठिकाणी मोड यायला ठेवून द्यावे (किमान ८-१० तास)
२) हलकेसे मोड आले की मिक्सरमध्ये घालावे. त्यात मीठ, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून पाणी न घालता वाटून घ्यावे. थोडे भरडसर मिश्रण करावे. यामध्ये गाजर, भोपळी मिरची, आणि कोबी घालावी.
३) मिक्स करून १ इंचाचे गोळे करावे. मायक्रोवेव्हमध्ये १-२ मिनिटे वाफवून घ्यावे.
४) कढईत तेल गरम करून वाफवलेले गोळे मध्यम आचेवर तळून घ्यावे. तळलेल्या बॉल्सना काट्याने टोचून ठेवावे.
व्हेजिटेबल बेड:
५) कढईत तेल गरम करून चिरलेले आले, लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि थोडे मीठ घालून कांदा लाईट ब्राऊन होईस्तोवर परतावे. नंतर कोबी, गाजर, सिमला मिरची घालून मोठ्या आचेवर अर्धा मिनिट परतावे. नंतर टॉमेटो केचप, सॉय सॉस, चिली सॉस, साखर आणि मीठ घालून काही सेकंदच परतावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये पसरवावे.
६) ("इतर साहित्या"त दिलेले प्रमाण) सॉय सॉस, टॉमेटो केचप, ग्रीन चिली सॉस, आणि मीठ एकत्र मिक्स करावे. किंचित पाणी घालावे. कढईत तेल गरम करावे. त्यात चिरलेली लसूण घालून परतावे. यात तयार केलेले सॉस मिश्रण घालावे. थोडे गरम झाले की तळलेले बॉल्स घालून मिक्स करावे. तयार बॉल्स व्हेजिटेबल बेडवर ठेवावे. गरम सर्व्ह करावे.

Hi Vaidehi,
ReplyDeleteMala don muli ahet. purvi poli bhaji khayachya. athavadyatun ekada, donada vegale karayache. pan ata shala badalali ahe. tar shalemadhe koni poli bhaji anat nahit. pan mala roj noodles, pizza, paav bhaje dene nahi awadat.
mala kahi option sangashil ka please. aajkal mi khup trast zhali ahe. kay karu kalat nahi.................
Thanks
Hi Vaidehi,
ReplyDeleteGhari Manchurian karatana te chikat hotat,pan hotel madhil Manchurian baherun crispy & aatun soft asatat.Tase honyasathi tips saanga,maida ,corn starchche aani water praman kiti asave
Amit Kadam
tyasathi corn flour jast ani maida kami ghalava.
DeleteTHANKS VAIDEHIJI.
Delete