Sabudana Chikwadi Papad
वेळ: पापड्या घालायला २० मिनिटे (वाळवायला २ दिवस) २५ ते ३० लहान पापड्या साहित्य: १/४ कप साबुदाणा १/८ ते १/४ टिस्पून मीठ (टीप १) १/४ ...
https://chakali.blogspot.com/2014/04/sabudana-chikwadi-papad.html?m=0
वेळ: पापड्या घालायला २० मिनिटे (वाळवायला २ दिवस)
२५ ते ३० लहान पापड्या
साहित्य:
१/४ कप साबुदाणा
१/८ ते १/४ टिस्पून मीठ (टीप १)
१/४ टिस्पून जीरे (टीप २)
प्लास्टिकचा जाड कागद
कृती:
१) साबुदाणा पाण्यात भिजवावा. साधारण २ सेंमी वर अशी पाण्याची पातळी ठेवावी. साबुदाणा रात्रभर भिजवावा. साबुदाणा पूर्ण फुलला पाहिजे.
२) आता साबुदाणा भिजून जेवढा झाला असेल त्याच्या दुप्पट पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आली की मीठ घालावे. भिजवलेला साबुदाणा घालावा.
३) उन्हं निघायच्या थोडावेळ आधी साबुदाणा पारदर्शक होईस्तोवर शिजवावा. पारदर्शक झाला की थोडे जीरे घालावे आणि मिश्रण ५-१० मिनिटे अर्धवट झाकण ठेवून थोडेसे निवू द्यावे. एका ताटलीत १ चमचा मिश्रण घालून पहावे. जर मिश्रण वाहात असेल तर थोडे अजून आटवावे. कारण मिश्रण जर पातळ असेल तर ते आवर धरणार नाही आणि पापड्या पसरतील.
४) जिथे व्यवस्थित ऊन लागेल अशा ठिकाणी प्लास्टिकचा कागद पसरवावा. त्यावर थोड्या थोड्या अंतराने लहान डावेने गोल अशा पापड्या घालाव्यात.
५) पूर्ण दिवस वाळवाव्यात. दिवस मावळला की घरात स्वच्छ जागी कागद तसाच ठेवावा. दुसऱ्या दिवशी पापड्या सोडवून पालटाव्यात दुसरी बाजू खडखडीत वाळू द्यावी.
साधारण २ ते ३ दिवसाचे ऊन पुरेसे होते. (२ दिवस वाळून पापड्या मोकळ्या झाल्या की ट्रेमध्ये किंवा सुपात घालून एक ऊन दाखवावे.)
तयार पापड्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या कोरड्या बरणीत भरून ठेवाव्यात.
टीपा:
१) मीठ जपूनच घालावे. मिश्रणाला हलकिशीच मिठाची चव लागलेली असावी. कारण वाळल्यावर मिठाची चव पुढे लागते. कमी मीठ घातले तरी वाळल्यावर मीठ बरोबर लागते.
२) जीरे घातल्याने रंग थोडासा बदलतो, अगदी पांढरा शुभ्र राहात नाही. पण चव जास्त छान लागते.
Hi! Mazi aaee sabudanyachya sandgyat rangpan ghalte. Khup chhan distat.
ReplyDeleteहो आवडीनुसार रंगसुद्धा घालू शकतो.
DeleteAre hi recipe mi thodya divsan purvi shodhat hote ani tu barobbar taaklis...thanks so much Vaidehi..blog khup chaan ahe...Manasi
ReplyDeleteDhanyavad..
Deleteवैदेही, तुमच्या receipes खूप छान असतात. प्रमाण पण एकदम perfect असते. Keep Posting!!!!!!
ReplyDeleteDhanyavad Savita
Delete