डाळ मेथ्या घालून चवळीची पालेभाजी - Chawli Dal Methya
Chawli Dal Methya in English वेळ: २० ते २५ मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: १ जुडी चवळी पालेभाजी १/४ कप तूरडाळ ३-४ लाल सुक्या मिरच...
https://chakali.blogspot.com/2014/04/chawli-dal-methya.html?m=0
Chawli Dal Methya in English
वेळ: २० ते २५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१ जुडी चवळी पालेभाजी
१/४ कप तूरडाळ
३-४ लाल सुक्या मिरच्या
८-१० लसणीच्या पाकळ्या, उभ्या चिरून
२-३ आमसुलाचे तुकडे
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १५ ते २० मेथीदाणे, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१ टेस्पून गूळ
कढीपत्ता
चवीपुरते मीठ
कृती:
१) पालेभाजी निवडून पाने खुडून घ्यावी. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. (साधारण दिड ते पावणेदोन कप चिरलेली)
२) तूरडाळ कुकरमध्ये फक्त १ किंवा २ शिट्ट्या करून अर्धवट शिजवून घ्यावी.
३) कढईत तेल गरम करून त्यात आधी मेथी दाणे आणि लसूण घालून लालसर परतून घ्यावी. नंतर मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या अशी फोडणी करावी.
४) पालेभाजी फोडणीत घालावी. मीठ घालावे. आच मध्यम करून पालेभाजी शिजू द्यावी. पालेभाजी शिजली की त्यात तूरडाळ घालावी. अगदीच गरज लागल्यास थोडेसे पाणी घालावे.
५) आमसुलं घालावीत. मंद आचेवर भाजी शिजू द्यावी. गूळ घालून १ उकळी काढावी. भाजी गरमच वाढावी.
(यामध्ये काळामसाला घालायची गरज नाही. पण आवडत असल्यास थोडासा घातला तरी चालेल. चव पाहून ठरवावे.)
टीप:
१) भाजी वाढायच्या २ मिनिटे आधी १ टेस्पून तेलाची लसूण, लाल मिरची आणि हिंग घालून फोडणी करून भाजीवर घालावी. अधिक रुचकर लागते.