चीजी स्प्रिंग ओनियन पराठा - Cheese Onion Paratha
Cheese Spring onion Paratha in English वेळ: २५ मिनिटे ६ पराठे साहित्य: ५ पाती कांद्याच्या मोठ्या काड्या (चिरल्यावर साधारण ३/४ ते १ कप) ...
https://chakali.blogspot.com/2013/03/cheese-onion-paratha.html?m=0
वेळ: २५ मिनिटे
६ पराठे
साहित्य:
५ पाती कांद्याच्या मोठ्या काड्या (चिरल्यावर साधारण ३/४ ते १ कप) (कांदा आणि पात दोन्ही वापरावे)
सव्वा कप गव्हाचे पीठ
१ टेस्पून तेल
१/२ टीस्पून ओवा
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
२ चिमटी गरम मसाला
१ कप किसलेले चीज
चवीपुरते मीठ
तूप पराठे भाजण्यासाठी
कृती:
१) पाती कांदा स्वच्छ धुवून बारीक चिरावा. त्यात मीठ घालून मिक्स करून ठेवावे. ५ मिनिटांनी तेल, हिरवी मिरची, गरम मसाला आणि गव्हाचे पीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून भिजवावे.
२) तवा गरम करावा. भिजवलेल्या पीठाचे ६ समान भाग करावे. थोडे कोरडे पीठ ३ इंच लाटावा. मधोमध २ चमचे चीज घालावे. कडा एकत्र जुळवून बंद करावे. नंतर हलक्या हाताने कोरड्या पिठावर पराठा लाटावा. मध्यम आचेवर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. भाजताना थोडे तूप सोडावे.
गरमागरम पराठा लोणच्याबरोबर किवा रायत्याबरोबर सर्व्ह करावे.
टीपा:
१) हा पराठा चीजशिवायही छान लागतो
२) गव्हाच्या पीठाऐवजी दुसरी पीठे घालूनही पराठे छान होतात.
३) शक्यतो पीठ मळून लगेच पराठे बनवावे. कारण पातीकांद्याला पाणी सुटते आणि मळलेले पीठ पातळ होते.
mi atach try kela thoda variation anun..pan mast zalay..thanks..mi tyat kothimbirichi chatani, dhane jeere pud ani craft single cheese ghatale coz ididnt hv the grated cheese..also i mixed veggies and cheese together and then made parathas out of it..thanks though :)
ReplyDeleteThanks for the comment.
ReplyDelete