पिठ पेरून भोपळी मिरची - Capsicum Stir Fry
Capsicum Stir Fry in English वाढणी: २ जणांसाठी वेळ: २० मिनीटे साहित्य: २ मोठ्या भोपळी मिरच्या २ टेस्पून तेल १/८ टिस्पून मोहरी, १/४ ट...
https://chakali.blogspot.com/2009/12/capsicum-bhaji-bhopli-mirchi.html?m=0
Capsicum Stir Fry in English
वाढणी: २ जणांसाठी
वेळ: २० मिनीटे
साहित्य:
२ मोठ्या भोपळी मिरच्या
२ टेस्पून तेल
१/८ टिस्पून मोहरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ ते ३ कढीपत्ता
चवीपुरते मिठ
२ चिमटी साखर
४ ते ५ टेस्पून बेसन (आवडीनुसार कमी-जास्त)
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) भोपळी मिरची अर्धी कापून आतील बिया काढून टाकाव्यात. भोपळी मिरचीचे लहान चौकोनी तुकडे करावेत. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली भोपळी मिरची घालून परतावे. झाकण ठेवून मंद आचेवर २ ते ३ वेळा वाफ काढावी. पाणी अजिबात घालू नये.
२) भोपळी मिरची थोडी शिजली कि मिठ, साखर घालून मिक्स करावे. एक चमचा बेसन पिठ पेरावे. मिक्स करून आवडीप्रमाणे पिठाचे प्रमाण वाढवावे. वाफेवर बेसन शिजू द्यावे. भाजी तयार झाली कि कोथिंबीर घालून ढवळावे आणि पोळीबरोबर गरमा गरम सर्व्ह करावे.
टिप:
१) भाजीला आंबटपणा हवा असेल तर थोडा लिंबाचा रस भाजीमध्ये घालावा.

waw mastch thanks vaidehi
ReplyDeleteही तर माझ्या आवडीची भाजी. एवढ्या एकाच भाजीसाठी मला मिरची हा शब्द प्रिय आहे. पोळीबरोबर ही भाजी खूप छान लागते. माझी आई जशी भाजी करते, अगदी तश्शीच रेसिपी तुम्ही दिली आहे. धन्यवाद!
ReplyDeletehi कांचन,
ReplyDeleteमलापण खुप आवडते हि भाजी :) कमेंटसाठी धन्यवाद
Hi Vaidehi, aaj mi tuzya recipe pramane hi bhaji keli, khupach chavishta zali hoti. Mi aadhi pani ghalun karayche tyamule ashi jamat navati..
ReplyDeleteaaj perfect jamali!! Thanks to you :)
Tula chakali blog sathi khup khup shubhechha!!
धन्यवाद वर्षा
ReplyDeleteVaidehi kaku,
ReplyDeleteThanks for the recipe. Mahjya Europeans mitrana hi bhaji khupach avadli
dhanyavad
ReplyDeletehi me aaj he bhaji kali kupch mast mala kup avadali thanks
ReplyDeleteतुमचा ब्लोग फारच मस्त आहे. अगदि आई जसे करते तसच तुमच्या recipies मधे आहे!
ReplyDeletethank you very much!
- Mukta
thank you commentsathi
ReplyDeleteNAMASTE SUGRANBAI...
ReplyDeleteKHARACH TUMHI SUGRAN AAHAT... TUMCHYA KUTUMBACHI TAR MAJACH AAHE..... TUMCHI WEBSITE MALA PHAR UPYOGI PADLI AAHE... MI ROJ REFER KARATE....MI MARATHA BUT MARRIED TO BRAHMIN.. V ALSO DONT EAT NON VEG.... PAN TUMCHYA MULE MALA VEG MADHE PHAR VARIETY MILALI.. MAZE MR. CHAVISHTA KHANYACHE SHAUKIN AAHET... TYANCHI PHARMAISH PURNA KARANE HE TUMCHYA MULE SADHYA HOTATY.... MI JEVDHA MAZYA SASUBAINKADUN SHIKLE...TUMCHYA RECEIPIES AGDI TASHACH ASTAT.. KOKNASTH BRAHMINS TYPE... I LOVE TO DO IT N EAT IT...MI TUMCHYA BLOG MADHIL BHARPUR RECEIPES BANVALYA AANI TYA PHAR CHAN PAN ZALYA...
GR8 WORK KEEP IT UP''''''''' THANKS FOR UR HELP
RESHMA BAPAT
Hello Reshma,
ReplyDeleteVachun khup anand zala ki chakali blog tula itka upayogi padtoy te..khup chhan..recipes sathi tula kahi madat lagli tar nakki lihun kalav..
dhanyavad..
Hello.. Dhanyavad...
ReplyDeleteMi lagn karun americet aali... Tumchya recepe vachun darojcha svayampak karte... Sahaj sopya aslya mule karayala maja vatate.. Farach ruchkar hot at.. Anand vatato...Agdi. Diwalicha sagla faral mi tumchya receive vachun kelya...
Thank you Gauri
DeleteHI Veatdahi
ReplyDeleteThanks for your recipes
mi pith perun bhopali mirchi karte pan mazhi kadhich kordi hot nahi lagada type hote pls help how to make this mirchi.
पीठ थोडं भाजून घे आधी मग भाजीत घाल.
DeleteHi,i like this blog bcuz you give easy receip. I have one question when we make this bhaji this not bourn bcuz of besan.
ReplyDelete