पालक पनीर पराठा - Palak Paneer Paratha

Palak Paneer Paratha in English ६ ते ८ मध्यम पराठे साहित्य: दिड कप कणिक १ कप बारीक चिरलेला पालक १/२ कप किसलेले पनीर १/४ कप कांदा १/...

Palak Paneer Paratha in English

६ ते ८ मध्यम पराठे

Palak Paneer Paratha aloo palak parathaसाहित्य:
दिड कप कणिक
१ कप बारीक चिरलेला पालक
१/२ कप किसलेले पनीर
१/४ कप कांदा
१/२ कप दही
१ टिस्पून जिरेपूड
२ टिस्पून पुदीना चटणी किंवा
७ ते ८ पुदीना पाने + १/४ कप कोथिंबीर + १ लसूण पाकळी + २ लहान हिरव्या मिरच्या, सर्व बारीक चिरून किंवा बारीक वाटून
चवीपुरते मिठ
१ टिस्पून चाट मसाला
१/२ टिस्पून गरम मसाला
१ टेस्पून तेल
तूप किंवा बटर पराठे भाजण्यासाठी

punjabi paratha, butter paratha, oil free recipe, oil free paratha recipe, paratha recipe, palak paratha, aloo parathaकृती:
१) कणिक एका मोठ्या वाडग्यात घ्यावी त्यात चिरलेला पालक, किसलेले पनीर, कांदा, मिठ, चाट मसाला, गरम मसाला, जिरेपूड, पुदीन्याचे मिश्रण आणि तेल असे सर्व घालून मिक्स करावे. हे कणकेचे मिश्रण सुकेच मळावे.
२) नंतर यात दही घालून कणिक मळून घ्यावी. दही अंदाज घेत चमचा-चमचा घालावे आणि मळावे. मला साधारण १/२ कप दही लागले होते कणिक मळायला. मळलेले पिठ १/२ तास झाकून ठेवावे.
३) मळलेल्या कणकेचे साधारण ८ समान गोळे करावेत व गोल लाटून तव्यावर तूप किंवा बटरवर भाजावेत.
गरम पराठ्यावर लोणी घालावे आणि पुदीना चटणी, टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही लोणच्याबरोबर पराठा सर्व्ह करावा.

टीप:
ऑईल फ्री वर्जन किंवा लो कॅलरी वर्जन:
१) हे पराठे ऑईल फ्री वर्जनमध्ये सुद्धा छान लागतात. कृती वरीलप्रमाणेच फक्त कणिक मळताना तेल घालू नये. तसेच पराठे कोरडेच भाजावेत तूप, तेल किंवा बटरचा वापर टाळावा.
२) दही वापरताना ’फॅट फ्री योगर्ट’ वापरावे. तसेच फॅट फ्री मिल्क पासून बनवलेले पनीर वापरावे.

Labels:
Paneer Paratha, Palak Paneer Paratha, Palak Paratha, Spinach Paratha

Related

Spinach 993399061055045973

Post a Comment Default Comments

  1. वैदेही, मीही बरेच वेळा हे पराठे करते फक्त पनीर न घालता. सुंदरच होतात.
    तुझ्या कृतीने खजूर-आक्रोड केक केला, अप्रतिम झाला ग. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. Hi Vaidehi, paratha mastch disat aahe. Ag sadhya me jara maza jewelry business set up karnyat busy aahe. Business setup zala ki back to blogging..:)

    ReplyDelete
  3. Hey Chakli..
    tu yat dahi ghalun ka malales?
    aani paani ajibatch ghalayche nahi ka maltana?

    asmi

    ReplyDelete
  4. Hi Asmi

    aga dahi ghatle ki chav chan yete ani parathe ekdum naram rahtat..ani 1/4 te 1/2 kap dahich lagte..tasech palak ani mith ekatra kele ki palakala thode pani sutatech tyamule ajun panyachi avashyakta lagat nahi..

    ReplyDelete
  5. hey hi
    khup mast zale parothe. gr8 yaar
    thanks a lot

    ReplyDelete
  6. Hi Vaidehi... tuzya saglya recipes apratim astat n banwayla sopya pan astat. Traveling madhe carry karu shakto n 3 to 4 diwas tiktil asha paraths recipe saang na? Thanks to chakali blog...

    Regards
    Ragini....

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item