पाइनॅपल कोकोनट स्मूदी - Coconut Pineapple Smoothie

Coconut Pineapple smoothie in English वेळ: १० मिनीटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: दिड कप पाइनॅपल ज्यूस १ कप नारळाचे दूध १/२ कप...

Coconut Pineapple smoothie in English

वेळ: १० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी


साहित्य:
दिड कप पाइनॅपल ज्यूस
१ कप नारळाचे दूध
१/२ कप घट्ट दही
२-३ थेंब पाइनॅपल इसेंस
साखरेचा पाक, गरजेनुसार

कृती:
१) पाइनॅपल ज्यूस आईस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे.
२) ज्यूस गोठला की मिक्सरमध्ये क्युब्ज, नारळाचे दूध, दही, पाइनॅपल इसेंस आणि साखरेचा पाक घालून मिक्सरमध्ये फिरवावे.
सर्व्हिंग ग्लासमध्ये सर्व्ह करून पाइनॅपल पिसेसने गर्निश करावे.

Related

Summer 4888145122841130682

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item