सुरणाचे काप - Suranache Kaap

Spicy Suran Slices in English वेळ: २५-३० मिनिटे वाढणी: ५ ते ६ जणांसाठी साहित्य: ४०० ग्राम सुरण ::::मॅरीनेशनसाठी:::: २ टेस्पून लिंबाच...

Spicy Suran Slices in English

वेळ: २५-३० मिनिटे
वाढणी: ५ ते ६ जणांसाठी

साहित्य:
४०० ग्राम सुरण
::::मॅरीनेशनसाठी::::
२ टेस्पून लिंबाचा रस
१ टिस्पून हळद
२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून मीठ
::::रव्याचे मिश्रण::::
पाउण ते एक कप बारीक रवा
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) सुरण हाताळण्यापूर्वी हाताला कोकम लावून घ्यावे.किंवा सरळ प्लास्टीकचे/ रबरी हातमोजे वापरावे. सुरण सोलून घ्यावे आणि मोठे चौकोनी तुकडे करून ठेवावे. पाण्यात आमसूल घालून कोळून घ्यावे. या पाण्यात सुरण २ तास बुडवून ठेवावे.
२) मॅरीनेशनखाली दिलेले साहित्य एकत्र करावे (लिंबाचा रस, हळद, लाल तिखट, आणि मीठ). सुरणाचे पातळ काप करून घ्यावे. टॉवेलने थोडे पुसून घ्यावे. लिंबाच्या रसाचे मिश्रण प्रत्येक कापावर चोळावे. एका ताटलीत काप सेपरेट ठेवावे.
३) रवा, जिरेपूड, लाल तिखट, आणि मीठ एकत्र करून घ्यावे. काप रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्यावे. ३० मिनिटे तसेच ठेवून घ्यावे. (घोळवलेले काप फ्रीजमध्ये ३ दिवस राहतात. जेव्हा तळायचे असतील तेव्हा १-२ तास आधी फ्रीजबाहेर काढून ठेवावे.)
४) कापांवर थोडेसे पाणी स्प्रे करावे किंवा पाण्याचा हात घेउन हलकेच चेपावे म्हणजे तळताना रवा तेलात सुटणार नाही.
५) तेल गरम करून तेलात सुरणाचे काप तळून घ्यावे. गरमच सर्व्ह करावे.
जेवणात सुरणाचे काप तोंडीलावणी म्हणून छान लागतात.

टीप:
१) सुरणाचे काप शालो फ्राय करू शकतो. पण सुरण शिजायला बराच वेळ लागतो. त्यापेक्षा तळलेलेच बरे.

Related

Suran 7925049764067518672

Post a Comment Default Comments

  1. Hello Vaidehi,

    Suran ithe Americe madhe kuthe milala ? Frozen ?

    Majhi aai ajun eka paddhatine karate suranache kaap. Hirava masala ani Tandool peeth lavoon. Tujhi recipe try karen suran kuthe milat kalala ki :)

    Regards,

    Ketki

    ReplyDelete
    Replies
    1. Hello Ketaki

      Suran faar kvachit Indian store madhye milto.
      HIrva masala ani tandool pithachi recipe share karshil ka? karun pahin mag.

      Delete
  2. Suran ukadun sudha karata yeto na...... me tasa try kela aahe bakichi paddhat as is it. shijto pan changla aani hoto pan patkan

    ReplyDelete
  3. Ho Suran ukadun pan chan hoto. Atun mau ani varun kurkuri. Tuzya recipes chan ahet vaidehi. mi pahilya karun. Thank you.

    ReplyDelete
  4. Yummy ! suggest few more recipe , it's healthy ?

    ReplyDelete
  5. खराब खराब भाग कापून सबंध उकडावा. नंतर पीस करावेत. शॅलो फ्राय करावा

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item