चहाचा मसाला - Chai Masala

Tea Masala in English वेळ: ५ मिनिटे साधारण ३ ते ४ टेस्पून साहित्य: ४० वेलची (हिरवी) २५ काळी मिरी १५ ते १८ लवंग ५ काड्या दालचिनी (२ इ...

Tea Masala in English

वेळ: ५ मिनिटे
साधारण ३ ते ४ टेस्पून
साहित्य:
४० वेलची (हिरवी)
२५ काळी मिरी
१५ ते १८ लवंग
५ काड्या दालचिनी (२ इंच प्रत्येकी)
१ टेस्पून सुंठ पावडर
३/४ जायफळ, किसलेले

कृती:
१) वेलची सोलून घ्यावी. दालचिनी हाताने तुकडे करून घ्यावी.
२) सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे.

वापर:-
४ कप चहासाठी दीड ते दोन टिस्पून मसाला वापरावा. चहा पावडरबरोबरच हा मसाला घालावा. चहा उकळल्यावर आच बंद करून मिनिटभर झाकण ठेवावे. यामुळे मसाल्याचा स्वाद चहामध्ये चांगला मुरेल.

टीपा:
१) काळीमिरी, वेलची, दालचिनी आणि सुंठ यांची फ्रेश पावडर वापरूनही मसाला बनवू शकतो. जर दालचिनीचा स्वाद आवडत असेल तर ती थोडी जास्त घालावी.
२) चहाच्या मसाल्यात वाळवलेली चहाची पाती, बडीशेप आणि थोड्याशाच प्रमाणात चक्रीफूल घालू शकतो.
३) वेलची न सोलता वापरली तरी चालेल.

Related

Spices 8684695817596085351

Post a Comment Default Comments

 1. velchi solun ka ghyayachi?

  ReplyDelete
 2. Namaskar,

  Direct velchi vaparli tari chalel..

  ReplyDelete
 3. Thank u very much Vaidehi... for posting this recipe.. I will try soon...

  Regards
  Ragini...

  ReplyDelete
 4. chaha khupacha chan zala. thanks

  ReplyDelete
 5. Thank's For recepe......

  ReplyDelete
 6. बडिशोप किती घालायची वरील प्रमाणास?

  ReplyDelete
  Replies
  1. बडीशेप घालायची झाल्यास १/२ ते १ टिस्पून पुरेशी होईल.

   Delete
 7. hi ajach paper madhe tumchya baddal vachal mhnun lagech chaha masala try kela, khupch chan zalay thank u so much ata mala cooking ch tension nahi yenar

  ReplyDelete
 8. 1 लिटर ला किती चमचे मसाला लागेल
  आणि चहा पावडर किती वापरावी..?

  ReplyDelete
 9. आलं टाकावे का?

  ReplyDelete
 10. आलं टाकलं नाही तरी चालेल कारण आपण सुंठ पावडर घातलेली आहे.

  ReplyDelete
 11. 1 litre la 2 tsp chaha masala purel.

  ReplyDelete
  Replies
  1. वैदेही खूप दिवसात तुझ्या ब्लॉगवर काहीच अपडेट नव्हते म्हणून काळजी वाटत होती आज तुझी प्रतिक्रिया पाहून बरं वाटलं.

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item