Dinkache Ladu in English
वेळ: साधारण दिड तास
नग: साधारण २५ ते २८ मध्यम लाडूसाहित्य:
२०० ग्राम डिंक
तूप - साधारण १/२ किलोला थोडे कमी
१ कप मूगाचे पिठ
१ कप सोयाबिन पिठ
३/४ कप भरडसर वाटलेले बदाम
३/४ कप भरडसर वाटलेले काजू
३/४ कप भरडसर वाटलेले पिस्ता
१ कप खारीक पावडर
१/४ कप बेदाणे
१ कप सुके खोबरे
एका जायफळाची पावडर
३/४ किलो मऊ गूळ
कृती:
१) २०० ग्राम डिंक १/४ किलो तूपात तळावा. डिंक तळून उरलेल्या तूपात मूगाचे व सोयाबिनचे पिठ भाजून घ्यावे.
२) भरडसर वाटलेले बदाम, काजू पिस्ता आणि खारीक, प्रत्येकी एकेक चमचा तूपावर मंद आचेवर भाजून घेणे.
३) सुकं खोबरं कोरडंच भाजावं. जायफळ बारीक किसणीवर किसून घ्यावे.
४) तळलेला डिंक, भाजलेले सोयाबिन-मूगाचे पिठ, भाजलेला सुका मेवा, बेदाणे, भाजलेले खोबरे आणि जायफळ पूड एकत्र करून घ्यावे.
५) कूकरच्या तळाला १ भांडं पाणी घालावे. गूळ किसून कूकरच्या आतल्या डब्यात पाणी न घालता ठेवावा आणि डबा उघडाच ठेवावा. कूकर बंद करून २ शिट्ट्या होवू द्यावा. वाफ जिरली कि गरम गूळ एका परातीत घालावा. त्यामध्ये एकत्र केलेले जिन्नस (स्टेप क्रमांक ४) घालावे. सर्व एकत्र मिक्स करून लाडू वळावेत.
टीप:
१) गूळ कूकरमध्ये शिजवला कि त्याचा पाक करावा लागत नाही. जर कूकरमध्ये गूळ शिजवणे जमणार नसेल तर जाड बुडाच्या कढईत किसलेला गूळ आणि २ ते ३ टेस्पून पाणी घालून गूळ पूर्ण वितळू द्यावा. या पाकात जिन्नस घालावे आणि लाडू वळावे.
२) गूळ कूकरमध्ये शिजवला कि ५ मिनीटात कूकर उघडून गरम गूळच वापरावा.
डिंकाचे लाडू - Dinkache Ladu
10 comments
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting Chakali.Your comments are truly valuable!
Please feel free to share your ideas, suggestion, criticism, feedback for my recipes. You can also request a recipe. I'll try to answer you as soon as possible.
If you want to write to me personally, email me at chakalionline@gmail.com.
Subscribe to:
Post Comments (Atom)




काय हो? तुम्हाला टेलिपथीसुद्धा अवगत आहे का? हेच तर शोधत होते मी. येत नाही म्हणून काल रात्रीच विकत आणायचं ठरवलं होतं मी. ग्रेट आहात तुम्ही! मनापासून धन्यवाद.
गूळ कुकरमधे शिजवला की त्याचा पाक करावा लागत नाही.
अशा प्रकारे कुकरमधे शिजवलेला गूळ कुठल्याही पाककृतीत गुळाच्या पाकाला पर्याय म्हणून वापरता येईल का?
नमस्कार कांचनताई
ज्या रेसिपीमध्ये गूळाचा पाक, म्हणजे गूळामध्ये किंचीत पाणी घालून गूळ पातळ करायचा असतो त्यासाठी कूकरमध्ये शिजवलेला गूळ चालतो.
:) हो मला कळले कि कांचनताईंना डिंक लाडूंची रेसिपी पाहिजे आहे..म्हणून लगेच पोस्ट केली :D
hi vaidehi,
u r simply g8. this recipe seems to be very nutritious. thanx a lot for providing us such a good and healthy recipe. god bless u.
leena
thanks Leena
hi vaidehi
aga deenk barik karayacha ki tasach vaparayacha.
plz reply
DEEPALI GAIKWAD
Hi Deepali
dinkache barik barik gole astat te tasech talayche ani talalyavar kuskarayche
Hi vaidehi tai thanks!!
mala sang dink talalyas to mixer madhun barik kela tar mixer kharab nahi na honar?
ani Gulachya aivaji pithi sakhar vaparunhi karta yeilna..
Dipika
namaskar dipika
dink talalyavar mixer madhye barik karayachi avashyakta nahi.. hatanech barik hoil..
mi dinkachi pood vaparli hoti tyamule mixer hatane farse churadavehi lagle nahi.