Gavar Sandge
साहित्य: पाव किलो गवार दही जिरेपूड लाल तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट चवीपुरते मीठ कृती: १) गवार वाफवून घ्या. सुती कपड्यावर मोकळी करू...
https://chakali.blogspot.com/2014/05/gavar-sandge.html?m=0
साहित्य:
पाव किलो गवार
दही
जिरेपूड
लाल तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट
चवीपुरते मीठ
कृती:
१) गवार वाफवून घ्या. सुती कपड्यावर मोकळी करून गार होवू द्यात.
२) १/२ वाटी घट्ट दही घेउन त्यात जिरेपूड, तिखट आणि मीठ घालून मिक्स करा. त्यात गवार हलकेच घोळवून घ्यावी.
३) प्लास्टिक कागदावर मोकळी करून ठेवावी. एकावर एक घालू नयेत. त्यामुळे गवार नीट वाळत नाही.
४) उन्हात १ दिवस वाळवावी. दुसऱ्या दिवशी परत थोड्या दह्यात तिखट, जिरेपूड (गवारीची चव पाहून मीठ घालावे) घालून अर्धवट वाळलेल्या गवारी घोळवून वाळवाव्यात. असं ३ ते ४ दिवस दह्यात घोळवून वाळवावी. नंतर पूर्ण वाळेस्तोवर कडकडीत उन्हात वाळवावी.
५) डब्यात भरून ठेवावी. लागेल तशा मंद आचेवर तळून जेवताना तोंडी लावणी म्हणून खाव्यात.
टीप:
१) दह्याच्या मिश्रणात आवडीप्रमाणे दाण्याचा कूट, लसूण, जीरे वगैरे घालू शकतो. मिठ अगदी सांभाळून घालावे. जास्त झाल्यास सांडगे खूप खारट होतात.
२) गवार पूर्ण वाळली पाहिजे, म्हणजे खटकन मोडायला हवी. जर मऊ राहिली तर तिला बुरशी लागते. त्यामुळे पूर्ण वाळवा.
Nice recipe. Something new...
ReplyDeleteWe can do same recipe using Green Chillies na?