गुळांबा - Gulamba

Gulamba in English वेळ: १५-२० मिनिटे सव्वा कप गुळांबा साहित्य: १ कप कैरीचा किस (२ मध्यम कैऱ्या सोलून जाड किसणीवर किसाव्यात.) २ कप गुळ...

Gulamba in English

वेळ: १५-२० मिनिटे
सव्वा कप गुळांबा
साहित्य:
१ कप कैरीचा किस (२ मध्यम कैऱ्या सोलून जाड किसणीवर किसाव्यात.)
२ कप गुळ, चिरलेला
१/२ टिस्पून वेलची पावडर
६-७ लवंगा
१ टिस्पून तूप

कृती:
१) कढईत तूप घालून त्यात कैरीचा किस घालावा. मंद आचेवर २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी. किस कढईला चिकटू नये म्हणून मधेच तळापासून ढवळावे.
२) नंतर गुळ घालावा आणि ढवळावे. पाक पातळ झाला की लवंगा घालाव्यात. पाक थोडासाच आटवावा, साधारण एकतारी ते दोनतारी, कारण गुळांबा थंड झाल्यावर अजून आळतो. त्यामुळे पाक पळीवाढाच ठेवावा, जास्त घट्ट करू नये.
वेलचीपूड घालून आच बंद करावी. गुळांबा गार झाल्यावर बरणीत भरावा. फ्रीजमध्ये ठेवावा.

टीप:
१) कैरीचा किस थोडा कमी जास्त झाल्यास गुळाचे प्रमाण त्यानुसार बदलावे. नेहमी किसाच्या दुप्पट गुळ घ्यावा. (म्हणजे जर १ वाटी किस असेल तर २ वाट्या गुळ घ्यावा.)

Related

Travel 9160493285316036858

Post a Comment Default Comments

 1. Thank you for Gulamba... I was waiting for it. :)

  ReplyDelete
 2. Sakharamba karaycha asel tar yach paddhatine, gula aivaji sakhar takali tar chalel ka?

  ReplyDelete
  Replies
  1. Ho.chalel..It's nice for test.
   Thank You..:)

   Delete
 3. पिकलेल्या हापूस च्या फोडींचा साखर घालून केलेला साखर आंबा पण छान होतो. त्या मधे फक्त विलायची ऐवजी केशर घालायचं एवढंच.

  ReplyDelete
 4. Hi Dipti

  Sakharamba (kacchya kairicha) karaycha zalyas pudhil paddhat vapar

  http://chakali.blogspot.in/2011/02/morawla-amla-preserve.html

  Kairichya ambatpana nusar sakhar kami jast karavi. shakyato kisachya did pat sakhar ghyavi.

  ReplyDelete
 5. Nice.....I Like It !!!!!!!!

  ReplyDelete
 6. मोरांबा खूपच घट्ट झाल्यावर पातळ कसा करावा

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item