चाऊ मेईन - Chow Mein Noodles

Chow Mein in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ४ ते ५ साहित्य: तीनशे ग्राम नूडल्स २ टिस्पून भरून लसूण, बारीक चिरून १ टिस्पून आले, बारीक ...

Chow Mein in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ४ ते ५

साहित्य:
तीनशे ग्राम नूडल्स
२ टिस्पून भरून लसूण, बारीक चिरून
१ टिस्पून आले, बारीक चिरून
१ लहान भोपळी मिरची, उभी पातळ चिरून
७ ते ८ फरसबी, पातळ तिरके चिरून
१ लहान कांदा, उभा पातळ चिरून
२ पातीकांद्याच्या काड्या (कांद्याचा भाग गोल पातळ चकत्या कराव्यात. पाती तिरकी पातळ चिरावी.)
२ टिस्पून सोया सॉस
२ चिमटी मिरपूड
चवीपुरते मीठ
१ टेस्पून तेल

कृती:
१) पाकिटावरील सूचना वाचून नुडल्स कढईत शिजवाव्यात. नूडल्स शिजल्या की चाळणीत निथळून घ्याव्यात. त्यावर गार पाणी घालावे आणि १/२ चमचा तेल लावून ठेवावे म्हणजे नुडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत.
२) त्याच कढईत अडीच चमचे तेल गरम करावे. त्यात लसूण आणि आले काही सेकंद परतावेत. नंतर फरसबी, कांदा आणि पाती कांद्याचा पांढरा भाग घालून अर्धा मिनिट परतावे. नंतर भोपळी मिरची घालून अर्धा मिनिट परतावे.
३) मीठ आणि सोयासॉस घालावा. ५-७ सेकंदांनी शिजवलेल्या नूडल्स घालाव्यात. सोयासॉस नुडल्सला सर्वत्र लागेल असे नीट मिक्स करावे. मिरपूड घालून टॉस करावे.
पाती कांदा थोडा आत घालावा आणि थोडा सजावटीसाठी ठेवावा. गरम नुडल्स चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह कराव्यात.

टीप:
१) लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा पार्टीसाठी बदल म्हणून या नुडल्स छान लागतात. मिरपूड अगदी कमी घालावी.

Related

Party 1034011590350444732

Post a Comment Default Comments

  1. What is the basic difference in the recipe of chow mein noodles and hakka noodle?

    ReplyDelete
  2. Chow mein noodles are mild in taste. These noodles are usually serve with a gravy dish.
    Hakka noodles are spiced and well flavored noodles. So don't require any side dish.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item