पनीर फ्रॅन्की - Paneer Frankie

Paneer Frankie in English Paneer is a very versatile ingredient. It can be used in sweet as well as savoury dishes. Though paneer is more ...

Paneer Frankie in English

Paneer is a very versatile ingredient. It can be used in sweet as well as savoury dishes. Though paneer is more popular in main dishes like Paneer Masala, Palak Paneer, Paneer Kofta etc. , it can be used to make healthy and delicious snack like the recipe posted below. This is a filling, kid friendly and nutritious snack. For preparing this dish, fresh made Paneer from milk is highly recommended. The wraps will be very tasty if the Paneer is fresh. Sometimes, the ready made paneer contains all purpose flour to make it firm and more suitable for Tikka and Sabjis. Wraps, Soups and Salads taste well with soft fresh paneer.

६ ते ७ पनीर फ्रॅन्की
वेळ: ४५ मिनीटे

Paneer Wraps, Paneer Roll, Paneer Snacks, Paneer fankieसाहित्य:
दिड कप पनीर, छोटे तुकडे
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
१/४ कप कांदा, पातळ उभे काप
१/४ कप भोपळी मिरची, बारीक चिरून
१ टेस्पून तेल
मॅरीनेशन
१/४ कप दही
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून आले-लसूण पेस्ट
१ टेस्पून तांदूळ पिठ
२ चिमूटभर कसूरी मेथी
१/२ टिस्पून गरम मसाला
१/२ टिस्पून चाट मसाला
चवीपुरते मिठ
रॅप्स
१ कप कणिक
१/४ कप दुध
चवीपुरते मिठ
१ टेस्पून बटर, वितळलेले
मिंट चटणी (ऐच्छिक)

कृती:
१) मॅरीनेशनखाली दिलेले सर्व साहित्य एका वाडग्यात मिक्स करावे. पनीरचे तुकडे घालून चमच्याने मिक्स करावे. पनीरच्या तुकड्यांना मॅरीनेशन निट लागले पाहिजे. मॅरीनेट केलेले पनीर दुसर्‍या वाडग्यात काढून उरलेल्या मॅरीनेशनमध्ये टोमॅटो घालून मिक्स करावे. पनीर २० मिनीटे झाकून ठेवावे.
२) कणिक, मिठ आणि दुध एकत्र करून कणिक मळून घ्यावी. झाकून २० मिनीटे बाजूला ठेवावे.
३) एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून त्यात कांदा ३० सेकंद परतावा. भोपळी मिरची घालून ३० सेकंद परतावे आणि मॅरीनेट केलेले पनीर आणि टोमॅटो घालून परतावे. मिनीटभरच परतावे. खुप वेळ परतू नये नाहीतर पनीर वितळते. चव पाहून वाटल्यास मिठ. तिखट घालावे. तयार स्टफींग एका वाडग्यात काढून ठेवावे.
४) कणिक ८ ते १० समान गोळ्यांमध्ये विभागून घ्यावी. पोळी लाटून तव्यावर नेहमीप्रमाणे भाजून घ्यावी. फक्त भाजताना थोडे बटर लावावे. पोळ्या मऊ राहण्यासाठी डब्यात भरून ठेवाव्यात.
५) जेव्हा पनीर फ्रॅन्की सर्व्ह करायचे असतील तेव्हा पनीरचे मिश्रण मायक्रोवेवमध्ये थोडे गरम करून घ्यावे. जर रॅप्स थोडे स्पाईसी बनवायचे असतील तर पोळीला थोडी मिंट चटणी लावावी. गरम तव्यावर हि पोळी ठेवावी. मध्यभागी दिड टेस्पून पनीरचे मिश्रण ठेवावे. आणि दोन्ही बाजू पनीरच्या मिश्रणावर ठेवून सुरळी करावी. सावकाशपणे गरम करावे आणि गरमा गरम सर्व्ह करावे. हे रॅप्स नुसतेही छान लागतात पण वाटल्यास टोमॅटो केचप आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Paneer Frankie, Paneer wraps, Spicy Paneer Rolls

Related

Snack 5116774002103486969

Post a Comment Default Comments

  1. मस्तच! चला, आता पुढच्या आठवड्यातील नवीन डिशचा प्रश्‍न सुटला.

    ReplyDelete
  2. good recipe! i used tofu instead of paneer and it came out well too!

    ReplyDelete
  3. Hi kanchan and gauri
    comment sathi dhanyavad..

    gauri,
    tofu chi idea changli ahe..

    ReplyDelete
  4. hi

    tuzya recipes khup chan astat mala tyancha khup fayda hoto. thanks

    suvarna

    ReplyDelete
  5. Dear Chakali,
    tumchyaa sagalyaach recipes mast aahet. your blog is a very good guide for new cooks like me... thank you very much.

    ReplyDelete
  6. धन्यवाद चैत्रपालवी

    ReplyDelete
  7. Thank u so much all the recipes..............
    Before 2 days i tried Dabeli & it was very tasty (my husband likes it very much)
    can u pls share the recipe of Patodachi Amti........

    Gouri

    ReplyDelete
  8. Hi वैदेही,
    मला तुमच्या सगळ्या recipes खूपच आवडतात.आज हि Paneer Frankie केली आहे. मला खात्री आहे कि घरी सगळ्याना खूप आवडेल. once again, thanks a lot! keep posting such nice,different recipes.
    Thnx,
    सीमा

    ReplyDelete
  9. zakas yarrrrrrrrrrrr osam dish............

    ReplyDelete
  10. Classic zali hi dish agdi. Masta mood ban gaya.
    Thanks very much Vaidehi!

    ReplyDelete
  11. स.न.वि.वि.
    तोन्डल्यांची भाजीची कृती शोधताना पनीरफ्रॅन्कीची कृती मिळाली,पौष्टिक आणी चमचमीत पनीरफ्रॅन्की लहान व मोठी मुलं आवडीने खातात.लक्ष्मी रोडवर सिटी पोष्ट व सोन्यामारुती चौक याच्या मध्ये एक भोजनालय होते. जेवण राजस्थानी पद्धतीचे असायचे. एक रुपयात पोटभर जेवण मिळायचे (१९६१-६२).वर्तुळाकार तोन्डल्याच्या चकल्यांची आंबट-गोड डाळ टाकुन केलेली भाजी आठवड्यातनं २-३ दा मिळायची. वेळ व रेसिपी असेल तर इमेलने पाठविणे. धन्यवाद

    ReplyDelete
  12. नमस्कार जनार्दनजी
    कमेंटसाठी धन्यवाद..मी नक्की तोंडल्याची भाजीची रेसिपी पोस्ट करायचा प्रयत्न करेन,
    तुम्ही म्हणताय तिथे कधी खाऊन पाहिलेले नाही तरीही प्रयत्न करून पाहीन..
    तोंडल्याच्या इतर रेसिपीजसाठी इथे क्लिक करा

    ReplyDelete
  13. Dear Chakali
    first let me thnak you then coment you :)..
    I am newly married wife moved to new place no mother in law to teach on how to cook n what to cook.so when i have to look about any receipy or help i go to your BLOG..It helps me alot.
    Now my husband calls me "sugaran" thanks to you .. :)

    Well i have no idea about you but it will be very helpful for me if you can share few non-veg dishes too or if you have already a seperate blog for that please fwd that "gurugranth" to me :) ..

    I know i m saying this again n again but yes

    Thanks
    Prajakta :)

    ReplyDelete
  14. Hi Prajakta,

    First of all thank you very much for this lovely comment..and I am really glad that Chakali blog helps you in the kitchen.
    You have asked for non-veg recipes. Unfortunately, I don't cook or eat non-veg food. I am a vegetarian

    ReplyDelete
  15. Paneer Frankie karun baghitali..khup avdali..mint chutney poli la lavun frankie adhik chhan lagate.
    mi polya nehmi ghadichya karate, pan hyaveli fulake kele.
    kanket doodh ghalanyavishayi mala prashna ahe.
    fulake banavatana doodh ghalatat ka? doodhane polya mau hotat ka? dhoodh ghalanyamage prayojan kay? dhanyavad.
    -Dhanalaxmi

    ReplyDelete
  16. Dhanyavad Dhanalakshmi

    Polya karaychi jar practice asel tar panyat bhijavlelya kanakene suddha polya changalya hotat...
    dudh ghatalyane mau rahtat karan dudhamadhye fat content astat.. je polya moist thevtat..

    ReplyDelete

item