मूगाची डाळ - Moogachi dal
Moogachi dal हि आंध्र पद्घतीची एक डाळ आहे. करायला सोपी आणि चवीला मस्तच !! साहित्य: १/२ कप पिवळी मूग डाळ १ लहान कांदा १ लहान टोमॅटो २...
https://chakali.blogspot.com/2007/11/moogachi-dal.html?m=0
Moogachi dal
हि आंध्र पद्घतीची एक डाळ आहे. करायला सोपी आणि चवीला मस्तच !!

साहित्य:
१/२ कप पिवळी मूग डाळ
१ लहान कांदा
१ लहान टोमॅटो
२-३ हिरव्या मिरच्या
१ लाल सुकी मिरची
१ चमचा मद्रास करी मसाला / गरम मसाला
लिंबाचा रस / चिंच
फोडणीसाठी १ टेस्पून तेल, ३-४ कढीपत्ता, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद.
मिठ
कोथिंबीर
कृती:
१) कांदा टोमॅटोचे मोठ्या चौकोनी फोडी करून घ्याव्यात. कूकरमध्ये मूगाच्या डाळीत कांदा-टोमॅटोच्या फोडी घालून डाळ शिजवून घ्यावी. कांदा-टोमॅटो डाळीबरोबर शिजवल्याने छान स्वाद येतो.
२) डाळ शिजली कि रवीने एकजीव करून घ्यावी. कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात शिजलेली मूग डाळ घालावी. हि डाळ घट्टसरच चांगली लागते त्यामुळे आवश्यक तेवढेच पाणी घालावे.
३) एक उकळी आली कि त्यात मसाला घालावा. लिंबाचा रस/ चिंचेचा कोळ आणि चवीपुरते मीठ घालावे, कोथिंबीर घालावी. गरम गरम तूप-भाताबरोबर हि डाळ मस्त लागते.
टीप:
१) जर लसणीची चव आवडत असेल तर फोडणीत लसूण बारीक चिरून घालावी.
२) चिंचेपेक्षा लिंबाचा स्वाद जास्त चांगला लागतो.
Labels:
Moong Dal recipe, Moog dal recipe, Moogachi Dal, South Indian Dal

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ReplyDelete