भरली मिरची - Bharali Mirchi

Bharali Mirachi १) लांबट हिरव्या मिरच्या २) तयार भरली मिरची साहित्य: २ लांबट हिरव्या मिरच्या (या मिरच्या कमी तिखट असतात, आणि त्यां...

Bharali Mirachi

१) लांबट हिरव्या मिरच्या

bharali mirachi, mirachichi bhaji, masala mirachi, stuffed mirachi, stuffed capsicum २) तयार भरली मिरची



साहित्य:
२ लांबट हिरव्या मिरच्या (या मिरच्या कमी तिखट असतात, आणि त्यांची साल जाडसर असते. पण चवीला खुप छान लागतात.)३ ते ३ १/२ टेस्पून चणा पिठ
१ टेस्पून खवलेला नारळ
१/२ टेस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर
१/४ टिस्पून हळद
२ टिस्पून लाल तिखट
चिमूटभर हिंग
चवीपुरते मीठ
१/२ टिस्पून साखर
तेल

कृती:
१) खवलेला नारळ सोडून सर्व मसाला एकत्र करावा. फ्राईंग पॅनमध्ये १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात आधी नारळ आणि नंतर बाकीचा मसाला घालावा. १-२ मिनीटे परतावे. मसाला बाजूला काढून ठेवावा.
२) मिरच्या धुवून पुसून घ्याव्यात. त्यांना उभी चिर द्यावी जेणेकरून त्यात मसाला भरता येईल.
३) मसाला मिरच्यांमध्ये भरावा. मसाला बाहेर पडू नये म्हणून दोर्याने मिरच्या बांधून घ्याव्या.
४) मध्यम आचेवर फ्राईंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करावे. त्यात किंचित लाल तिखट घालावे. ज्यामुळे मिरच्यांच्या बाहेरील बाजूंना फ्लेवर येतो. नंतर भरलेल्या मिरच्या पॅनमध्ये ठेवाव्यात. वरून झाकण लावून वाफ काढावी. २-४ मिनीटांनी मिरचीची बाजू पलटावी.
५) खाताना दोरा काढुन टाकावा.

टीप : आपल्या आवडीनुसार मसाल्यात थोडा गरम मसाला किंवा करी मसाला घालू शकतो.

Labels:
Stuffed Pepper, Stuffed Bell Pepper, North Indian Recipe, Indian Stuffed Mirchi recipe

Related

Maharashtrian 6490279620442833398

Post a Comment Default Comments

  1. My mother uses Capsicum i/o लांबट हिरव्या मिरच्या

    ReplyDelete
  2. ho amchya ghari suddha ashach banatat mirchya...pan lambat mirchyanna ek veglach swad asto...

    ReplyDelete
  3. Thank you sooooo much. tondala pani suttay....... making it right now:)
    Love spicy food
    Amrita

    ReplyDelete
  4. hi vaidehi,

    tumhi dilelya recipes khupppppppp chan aahet. jya recipes ekdum hard vatatat tya tumhi aamchyasathi khup easy kelya aahet. thank you very much dear.

    ReplyDelete
  5. thanks so much for this yummy recipe! i m making it right now!

    ReplyDelete
  6. Hi:
    I am from Mumbai and tried this recipe, it came out superb, though I m not a Maharastrian, we all loved this. Thanks for your post.

    ReplyDelete
  7. vaidehi rasgulla chi recipe post karna pls



    from
    ashu

    ReplyDelete
  8. Hi Ashu

    me nakki post karen rasgullachi recipe

    ReplyDelete
  9. wowwww........... kalach banavale, khupach chan lagale.

    Rashmi.

    ReplyDelete
  10. kalach banavale, khupach chan lagale.

    ReplyDelete
  11. Hi vaidehi,
    Khamang mirchi chi reciep post kara na plz. Ji aapan phodani sathi vaparato.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item