Melon Salad
Melon Salad in English वेळ: १५-२० मिनीटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १ कलिंगड १ टरबूज ड्रेसिंगसाठी: २ ते ३ टेस्पून लिंबाचा रस ...

वेळ: १५-२० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
१ कलिंगड
१ टरबूज
ड्रेसिंगसाठी:
२ ते ३ टेस्पून लिंबाचा रस
४ ते ६ टेस्पून साखर
२ चिमुटभर मीठ
१ चिमटी मिरपूड
कृती:
१) मेलन स्कुपरने कलिंगड आणि टरबुजाचे गोल आकारात स्कूप काढून घ्यावे. सर्व्हिंग बोलमध्ये हे बॉल्स अरेंज करावे. फ्रीजमध्ये ठेवून गार करावे.
२) साखर भिजेल इतपत पाणी घालून त्याचा पाक करून घ्यावा. पाक थोडा गार झाला की त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालावे. मिक्स करून तयार सलाडवर घालावे. लगेच सर्व्ह करावे.
टीप:
१) यामध्ये आवडीनुसार फ्लेवरसाठी पुदिना पाने चिरून घालू शकतो. थोडा काळं मीठ घातले तरीही चालेल.
१) भारतात हनीड्यू मेलन फारसे पाहायला मिळत नाही. याचा रंग लाईट पिस्ता असतो. जर ते मिळाले तर चव छान लागतेच आणि रंगसंगतीही सुरेख दिसते.