टॉमेटो गार्लिक चटणी - Tomato Garlic Chutney

Tomato Garlic Chutney in English वेळ: १५ मिनिटे २-३ जणांसाठी साहित्य: २ मध्यम टॉमेटो १०-१५ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून १/४ टिस्पून मि...

Tomato Garlic Chutney in English

वेळ: १५ मिनिटे
२-३ जणांसाठी


साहित्य:
२ मध्यम टॉमेटो
१०-१५ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून
१/४ टिस्पून मिरपूड
१/२ ते १ टिस्पून विनेगर
२ टेस्पून तेल
१/४ टिस्पून हिंग
१ कढीपत्ता डहाळी
४-५ लाल सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मीठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात चिरलेली लसूण घालून गुलाबीसर परतावे. नंतर मोहोरी, हिंग, कढीपत्ता, आणि लाल मिरच्या घालून फोडणी तयार करावी. त्यात चिरलेले टॉमेटो आणि मीठ घालून टॉमेटोचा कच्चा वास जाईस्तोवर परतावे.
२) टॉमेटो चांगले शिजले की आच बंद करावे. मिश्रण गार होवू द्यावे. त्यात व्हिनेगर आणि मिरपूड घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी.
ही चटणी कोकोनट राईस, डोसा इत्यादीबरोबर छान लागते. मोहोरी, हिंग आणि कढीपत्ता न घालता ही चटणी बनवली तर मोमोजबरोबरही छान लागते.

Related

Tomato 7777354721990080042

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item