लेट्यूस सलाड - Lettuce and Fruit Salad

Delicious Salad in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: २०० ग्राम सलाडची पाने (मी रोमेन लेट्युस वापरला होता. याची चव जास...

Delicious Salad in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी


साहित्य:
२०० ग्राम सलाडची पाने (मी रोमेन लेट्युस वापरला होता. याची चव जास्त चांगली असते आणि हा लगेच मऊ पडत नाही)
१ मध्यम संत्र
१ मध्यम लाल आणि करकरीत सफरचंद
१/२ कप मलबेरी
१/४ ते १/२ कप डाळिंब
१ लहान कांदा (उभे पातळ काप) (टीप वाचा)
६-७ बदाम, अर्धवट कुटलेले
२ ते ३ टेस्पून बेदाणे
३ टेस्पून पिस्ता
१/४ कप चीजचे लहान तुकडे
१/४ कप संत्र्याचा ज्यूस
२ चिमटी मीठ
२ चिमटी मिरपूड
आवडीनुसार सलाड ड्रेसिंग

कृती:
१) संत्रं सोलून घ्यावे. फोडींवरील पातळ साल काढून हलक्या हाताने आतील गर वेगळा काढावा.
२) सफरचंद कापून मध्यम फोडी कराव्यात. संत्र्याच्या ज्यूसमध्ये या फोडी बुडवून बाहेर काढून ठेवाव्यात.
३) लेट्युसची पाने धुवून घ्यावी. हाताने मध्यम तुकडे करावे. कात्री किंवा सुरीने चिरू नये, हातानेच तुकडे करावे.
४) सलाड ड्रेसिंग आणि संत्र्याचा ज्यूस एकत्र करावे.
५) मोठे काचेचे बोल घ्यावे. त्यात आधी लेट्युसमधली निम्मी पाने घालावे. त्यावर निम्मे सफरचंद, संत्रे, मलबेरी, डाळिंब, कांदा, बदाम, पिस्ता, आणि चीज घालावे. त्यावर थोडेसे मीठ आणि मिरपूड भुरभुरावे. सलाड ड्रेसिंग आणि ऑरेंज ज्यूसचे निम्मे मिश्रण घालावे. त्यावर परत उरलेले लेट्युस, सफरचंद, संत्रे, मलबेरी, डाळिंब, कांदा, बदाम, पिस्ता, आणि चीज घालावे. थोडेसे मीठ आणि मिरपूड भुरभुरावे. सलाड ड्रेसिंग आणि ऑरेंज ज्यूसचे उरलेले मिश्रण घालावे.


टिप्स:
१) हे सलाड काही तास आधी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अशावेळी कांदा आणि ऑरेंज ज्यूस आधी घालू नये. सर्व्ह करायच्या आधी १० मिनिटे हे दोन्ही घालून मिक्स करावे.
२) यामध्ये सिझनमध्ये असतील अशी फळंसुद्धा घालू शकतो. द्राक्षं, कलिंगड, आंबाही छान लागतो.
३) कांदा ऐच्छिक आहे.
४) मी गार्लिक ड्रेसिंग वापरले होते. पण मार्केटमध्ये वेगवेगळया प्रकारची द्रेसिंग्ज अवेलेबल असतात. आवडीनुसार वापरावी.

Related

Salad 6972141005492801568

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item