बेरीच्या वड्या - Toopachya Berichya Vadya

Berichya Vadya in English वेळ: १० ते १५ मिनिटे १० ते १२ मध्यम वड्या साहित्य: १/४ कप बेरी १/४ कप साखर १/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याच...

Berichya Vadya in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
१० ते १२ मध्यम वड्या


साहित्य:
१/४ कप बेरी
१/४ कप साखर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१/४ टिस्पून वेलचीपूड
साखर बुडेल इतपत पाणी

कृती:
१) बेरी हाताने मोडून घ्यावी. शेंगदाण्याचा कूट तयार ठेवावा.
२) जाड पातेल्यात साखर घालून ती बुडेल इतपत पाणी घालावे. उकळवून साखर विरघळली कि आच मंद करावी. ढवळत राहावे. पक्का पाक करावा (टीप १). त्यात बेरी, वेलचीपूड आणि शेंगदाणा कुट घालावा. मिक्स करून घ्यावे.
३) मंद आचेवर २-४ मिनिटे तळापासून ढवळावे. १/२ चमचा मिश्रण ताटलीत काढावे. फुंकर मारून थोडे गार करावे. बोटांना थोडे तूप लावून त्याचा गोळा करावा. जर मऊ गोळी झाली तर आच बंद करून तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण काढून थापावे.
४) मिश्रण थोडे आळले कि वड्या पाडाव्यात.

टीप:
१) गोळीबंद पाक करण्यासाठी साखर बुडेल इतपत पाणी घ्यावे. साखर विरघळून पाक थोडा फेसाळला कि आच मंद करावी. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात २-३ थेंब पाक घालून तो बोटांनी एकत्र करावा. जर पाक लगेच पाण्यात विरघळला तर अजून थोडावेळ उकळवावे. १-२ मिनिटांनी परत तीच कृती करावी. जेव्हा वाटीत टाकलेल्या पाकाच्या थेंबाची  मऊ गोळी तयार होईल तेव्हा पाक झाला असे समजावे. यावेळी कुट आणि बेरी घालून २ मिनिटे ढवळावे. मिश्रणाचा छोटा भाग ताटलीत काढावा. बोटाला तूप लावून त्याची मऊ गोळी होतेय का ते पहावे. झाली तर लगेच तूप लावलेल्या ताटलीत थापावे. वड्या पाडाव्यात.

Related

Sweet 2287018063453842373

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item