कांदा मुळा गाजर कोशिंबीर - Kanda Gajar Mula koshimbir

Carrot Radish Onion Koshimbir in English वेळ: ७ ते १० मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १/२ कप गाजराचा किस १/२ कप मुळ्याचा किस ...

Carrot Radish Onion Koshimbir in English

वेळ: ७ ते १० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

साहित्य:
१/२ कप गाजराचा किस
१/२ कप मुळ्याचा किस
१/२ कप चिरलेला कांदा
१ टिस्पून तेल, १ चिमटी जीरे, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून हिरवी मिरची पेस्ट
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून साखर
१ टिस्पून साखर
१ टिस्पून लिंबाचा ज्यूस
चवीपुरते मीठ

कृती:
१) किसलेले गाजर, मुळा, आणि चिरलेला कांदा एकत्र करावे. त्यात मिराचीपेस्ट, शेंगदाणा कुट, साखर, लिंबूरस, कोथिंबीर, आणि मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
२) कढल्यात तेल गरम करून त्यात जीरे, हिंग, आणि हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी कोशिंबिरीवर घालावी. मिक्स करून सर्व्ह करावी.

Related

Raddish 3093567563084881249

Post a Comment Default Comments

 1. Hi
  Wegla aahe . Ek number zaliye. Thanks

  ReplyDelete
  Replies
  1. Dhanyavad

   Try karun paha.. chaan lagte hi koshimbir.

   Delete
 2. Kakdi ghatli tar chalte ka

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item