फोडणीचा पाव - phodanicha paav
Bread chi Usal in English वेळ: १० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १० ब्रेडचे स्लाईसेस २ टेस्पून तेल फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १ च...
https://chakali.blogspot.com/2011/09/pavachi-usal-phodanicha-bread-pav.html
Bread chi Usal in English
वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१० ब्रेडचे स्लाईसेस
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, ४-५ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून (किंवा २ सुक्या लाल मिरच्या मोडून)
१/४ कप कांदा, बारीक चिरून
चवीपुरते मीठ आणि साखर
कोथिंबीर सजावटीसाठी
१ टीस्पून लिंबाचा रस
कृती:
१) ब्रेडच्या स्लाईसेसचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. किंवा हातानेच तुकडे करावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून परतावा.
३) कांदा परतताना मीठ घालावे आणि कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
४) ब्रेडचे तुकडे घालून २ चिमटी साखर पेरावी.
५) झाकण ठेवून मिडीयम आचेवर २-३ मिनिटे वाफ काढावी.
लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करावे.
टीपा:
१) ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालतो.

wow mast ekdum chan i lov the most
ReplyDeletedhanyavad shradhha
ReplyDeleteप्रिय वैदेहीताई,
ReplyDeleteतुझी फोडणीच्या पावाची पाककृती करून बघितली आणि मस्त झाली. मुख्य म्हणजे नवऱ्याला आवडली :) धन्यवाद
thanks Nirmitee
ReplyDeleteHi just want to ask u , He nehmi kharat hote aani khup tel lagta bread mule. So kahi upay ahey ka ?? Thanx
ReplyDeleteनमस्कार कल्याणी
ReplyDeleteब्रेडचे बारीक तुकडे केल्यावर त्याच्या क्वांटिटीच्या अंदाजानुसार मीठ घालू नका. ब्रेडमध्ये ऑलरेडी मीठ असते. त्यामुळे मीठ कमीच घालायचे. ब्रेड तेल शोषून घेतो. त्यामुळे थोडे तेल जास्त लागते हे खरे. पण त्यातल्यात्यात कमी तेल घालून फोडणी करावी. त्यात ब्रेड घातल्यावर किंचित पाण्याचा हबका मारावा आणि २ वाफा काढाव्यात. म्हणजे ब्रेड मऊ राहतो.
अजून एक उपाय म्हणजे ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करावा. यामुळे तेल कमी वापरले जाईल.
Thank u Tai..........tuzi khupach help hote mala! saglya receipes nehmi perfect astat....!
ReplyDelete