फोडणीचा पाव - phodanicha paav

Bread chi Usal in English वेळ: १० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १० ब्रेडचे स्लाईसेस २ टेस्पून तेल फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १ च...

Bread chi Usal in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी

bread chi usal, pavachi usal, phodnicha bread, phodnicha pavसाहित्य:
१० ब्रेडचे स्लाईसेस
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, ४-५ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून (किंवा २ सुक्या लाल मिरच्या मोडून)
१/४ कप कांदा, बारीक चिरून
चवीपुरते मीठ आणि साखर
कोथिंबीर सजावटीसाठी
१ टीस्पून लिंबाचा रस

कृती:
१) ब्रेडच्या स्लाईसेसचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. किंवा हातानेच तुकडे करावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून परतावा.
३) कांदा परतताना मीठ घालावे आणि कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
४) ब्रेडचे तुकडे घालून २ चिमटी साखर पेरावी.
५) झाकण ठेवून मिडीयम आचेवर २-३ मिनिटे वाफ काढावी.
लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करावे.

टीपा:
१) ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालतो.

Related

Snack 8258909951682754879

Post a Comment Default Comments

  1. wow mast ekdum chan i lov the most

    ReplyDelete
  2. प्रिय वैदेहीताई,

    तुझी फोडणीच्या पावाची पाककृती करून बघितली आणि मस्त झाली. मुख्य म्हणजे नवऱ्याला आवडली :) धन्यवाद

    ReplyDelete
  3. Hi just want to ask u , He nehmi kharat hote aani khup tel lagta bread mule. So kahi upay ahey ka ?? Thanx

    ReplyDelete
  4. नमस्कार कल्याणी

    ब्रेडचे बारीक तुकडे केल्यावर त्याच्या क्वांटिटीच्या अंदाजानुसार मीठ घालू नका. ब्रेडमध्ये ऑलरेडी मीठ असते. त्यामुळे मीठ कमीच घालायचे. ब्रेड तेल शोषून घेतो. त्यामुळे थोडे तेल जास्त लागते हे खरे. पण त्यातल्यात्यात कमी तेल घालून फोडणी करावी. त्यात ब्रेड घातल्यावर किंचित पाण्याचा हबका मारावा आणि २ वाफा काढाव्यात. म्हणजे ब्रेड मऊ राहतो.
    अजून एक उपाय म्हणजे ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करावा. यामुळे तेल कमी वापरले जाईल.

    ReplyDelete
  5. Thank u Tai..........tuzi khupach help hote mala! saglya receipes nehmi perfect astat....!

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item