फरसबीची भाजी - Farasbichi bhaji
Farasbichi Bhaji in English २ ते ३ जणांसाठी वेळे: २५ मिनीटे साहित्य: पाव किलो कोवळी फरसबी, चकत्या चिरून १ टेस्पून तेल फोडणीसाठी: १/८...
https://chakali.blogspot.com/2009/07/farasbichi-bhaji-french-beans-stir-fry.html
Farasbichi Bhaji in English
२ ते ३ जणांसाठी
वेळे: २५ मिनीटे
साहित्य:
पाव किलो कोवळी फरसबी, चकत्या चिरून
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून ओला नारळ
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी कोथिंबीर
कृती:
१) फरसबी बारीक चिरून घ्यावी. कूकरमध्ये २ शिट्ट्या करून फरसबी शिजवून घ्यावी. शिजवताना फरसबीत मिठ घालावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ओला नारळ घालून परतावे. त्यात शिजवलेली फरसबी घालावी. १/२ कप पाणी घालावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, गूळ आणि आमसुलं घालून मध्यम आचेवर थोडावेळ वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून पोळीबरोबर सर्व्ह करावी.
Labels:
Green beans stir fry, French beans, farasbichi bhaji
२ ते ३ जणांसाठी
वेळे: २५ मिनीटे
साहित्य:
पाव किलो कोवळी फरसबी, चकत्या चिरून
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून ओला नारळ
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी कोथिंबीर
कृती:
१) फरसबी बारीक चिरून घ्यावी. कूकरमध्ये २ शिट्ट्या करून फरसबी शिजवून घ्यावी. शिजवताना फरसबीत मिठ घालावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ओला नारळ घालून परतावे. त्यात शिजवलेली फरसबी घालावी. १/२ कप पाणी घालावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, गूळ आणि आमसुलं घालून मध्यम आचेवर थोडावेळ वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून पोळीबरोबर सर्व्ह करावी.
Labels:
Green beans stir fry, French beans, farasbichi bhaji
इतकी सजवली तरी शेवटी ती फरसबीचीच भाजी ना.....चवीतील मूळ पांचटपणा कसा काय सोडेल?
ReplyDeleteHi Ashwini,
ReplyDeleteho kharay!! pan bhajimadhye vyavasthit mith masala ghatla ki chan lagte hi bhaji..
AAge tumhi hasnar nahit na mala?? ek vicharu ka?? BINS chya bhaji la Farsabi mhanta ka??
ReplyDeleteNilima
Hi Neelima,
ReplyDeletenahi hasate me.. Farasbichya shenganna 'French beans' asehi mhantat..
:) thx vaidehi tai aage tuza ekhde pic laav ki hya blog la aamhala kitchen quin la baghayce :)
ReplyDeleteनमस्कार वैदेही,
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या पाककृती मला खूप उपयोगी पडल्या आहेत. इथे दिलेली कृतीही एकदम मस्त आहे.
मी अजुन एका प्रकारे फरसबी ची भाजी करते. त्याची कृती शेअर करू इछिते.
फरसबी ची भाजी - ३/५ जणांसाठी
१. चिरलेली फरसबी(१ किलो)
२. ४/५ हिरव्या मिरच्या - बारीक तुकडे किंवा एकदम बारीक चिरलेल्या
३. धणे-जिरे पाउडर (साधारण २ ते ३ चमचे)
४. नारळ-कोथिंबीर
५. २/३ चमचे तेल, जिरे-मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता
६. मीठ स्वादानुसार.(साधारण दीड ते २ चमचे)
कृती :
१. फरसबी धुवून चिरून घ्या. चिरलेल्या फरसबी ची फ्रोज़न पाकिटे सुद्धा चालतील.
२. २/३ चमचे तेलाची फोडणी करा. जिरा-मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिंग, हळद, कढीपत्ता व चिरलेल्या मिरच्या घाला.
३. मिरच्या जराश्या तेलात परतल्या की चिरलेली फरसबी घाला. यामुळे मिरच्यांचा तिखटपणा तेलात उतरतो.
४. भाजी नीट परतून घ्या. २/३ वाफा आणा.फरसबी शीजली की रंग थोडा हलका हिरवा होतो.
५. आता धणे-जिरे पाउडर घाला, परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
६. वरुन नारळ कोथिंबीर घाला.
टिप्स:
१. भाजी जर dry आवडत असेल तर मीठ घातल्यावर जरा मध्यम आचेवर परतून घ्यावी कारण मीठामुळे भाजीला पाणी सुटते.
२. आवडीनुसार या भाजीमधे बटाटा अथवा मटार सुद्धा घालू शकतो. अशा वेळी बटाटा/ मटार फोडणीत घालावेत आणि १वाफ काढावी.
khup chavishta aahe
ReplyDeleteThanx
ashi hi chinch gulachi bhaji aamhi tondlichihi karto.
ReplyDeletefarak evdhach ki tyaat aamhi kadhipatta ghaalat nahi.