भरली वांगी - Bharli Vangi
Stuffed Eggplant in English वाढणी: २ ते ३ जणांसाठी वेळ: ४० मिनिटे साहित्य: ६ ते ८ छोटी वांगी १/२ ते ३/४ कप खवलेला ओला नारळ ३ ते ...
https://chakali.blogspot.com/2007/12/bharli-vangi.html
Stuffed Eggplant in English
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: ४० मिनिटे
साहित्य:
६ ते ८ छोटी वांगी
१/२ ते ३/४ कप खवलेला ओला नारळ
३ ते ४ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
१ टीस्पून तिळ
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून धनेपूड
२ टीस्पून गोडा मसाला
२-३ टीस्पून किसलेला गूळ
३ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
फोडणीचे साहित्य : ३ टेस्पून तेल, १/८ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद,
चवीपुरते मीठ
कृती:
१) सारणासाठी नारळ, शेंगदाण्याचा कूट, तिळ, गोडा मसाला, लाल मिरच्या एकत्र करावे. वाटल्यास मिक्सरमध्ये बारीक करावे म्हणजे सारण मिळून येईल.
२) चिंचेच्या कोळात किसलेला गूळ घालून मिक्स करावे. गूळ विरघळला कि ते मिश्रण सारणात घालावे. मिठ, जिरेपूड घालावी.
३) वांगी स्वच्छ धुवून त्याच्या दांड्या बघाव्यात, जर त्यावर काटे असतील तर काटे कापून टाकावे. वांग्याला वरून अधिक चिन्हासारखे काप द्यावेत, पण पूर्ण कापून फोडी करू नयेत. कारण आपल्याला वांग्यात सारण भरायचे आहे.
४) सारण वांग्यात भरावे. थोडे सारण ग्रेव्हीसाठी बाजूला काढून ठेवावे. कढईत ३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, थोडे लाल तिखट घालून फोडणी करावी. बाजूला काढून ठेवलेली ग्रेव्ही घालावी, थोडे पाणी घालावे पाण्यात थोडे मिठ घालावे ज्यामुळे वांग्याच्या आत थोडे मिठ मुरेल. अलगदपणे भरलेली वांगी घालावीत. झाकण ठेवून मध्यम आचेवर उकळी काढावी. मधेमधे वांगी पलटावीत. तसेच गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालावे.
५) सुरीने वांगी शिजली आहेत कि नाही हे तपासून घ्यावे (टीप ४). वांगी नीट शिजली कि भाकरी किंवा पोळीबरोबर गरमागरम सर्व्ह करावीत.
टीप:
१) बाजारातून वांगी घेताना कोवळी, आकाराने छोटी वांगी घ्यावीत.
२) जर वांगी कढईत शिजवण्यासाठी वेळ नसेल तर कूकरमध्ये २ शिट्या कराव्यात. पण कूकरपेक्षा बाहेर शिजवलेली वांगी जास्त चविष्ट लागतात.
३) जर कांदा आवडत असेल तर फोडणीत बारीक चिरलेला थोडा कांदा परतावा. आणि मग वांगी घालावीत.
४) सुरी वांग्यात आरपार जाते पण कधीकधी मसाला वांग्यात आतपर्यंत मुरलेला नसतो. आणि मग मसाला न मुरल्याने वांगी तूरट लागतात. म्हणून एखादे वांगे अलगद उघडून पहावे. आतमध्ये जर थोडे पांढरट असेल तर अजून शिजू द्यावे.

सोबत भाकऱ्या ही हव्यात.दाण्याच्या कुटाने चव मस्तच लागते.
ReplyDeleteBharali Wangi,
ReplyDeleteKharach asa watat aahe ki monitor madhun kadhun aatachya aata khavi,Mazya jibhevar khup pani aalel aahe.
Tar mi aatach market madhey javun yach sahitya ghevun yeto aani lavkarat lavkar banavato.
Thanks!
महाराष्ट्राची "राष्ट्रीय" डिश ! :-)
ReplyDeleteमस्त पाककृती दिली आहे. तोंडाला पाणी सुटलन्!
ओल्या नारळाऐवजी भाजलेलं सुकं खोबरं कुटून सारणात घातलं तर चालेल का?
तसेच, भरली वांगी तयार झाल्यावर वरून कोथिंबीर बारीक कापून टाकली असता स्वादाचे चार चॉंद लागतात असा माझा अनुभव आहे.
चू.भू.द्या.घ्या.
अभिजीतजी
ReplyDeleteधन्यवाद कमेंटसाठी,
ओल्या नारळाऐवजी भाजलेले सुके खोबरे वापरू शकतो, पण ओल्या नारळाने चव जास्त छान येते.
हो नक्कीच चांगली लागते कोथिंबीर म्हणून फोटो काढताना घातली आहे :)
hi bharli vangi mazya gharatalya saglyana farach avadatat, pan barech divasat keli nahi, athvan karun dilyabaddal dhanyavad, udyach karin.
ReplyDeleteआत्ताच ही डीश करून पाहिली. चवीला अप्रतिम आहेत. रेसिपीसाठी खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteसोबत तुम्हाला मी बनवलेल्या याच डीशचा फोटो पाठवते आहे.
http://i576.photobucket.com/albums/ss210/mogaraafulalaa/BharliVangicopy.jpg
बिना लसणाची वांग्याची भाजी.. छेः! कल्पनाही करवत नाही मला तर..आमच्या गावाकडे एकदा खेड्यावर नुसता दाण्याचा कुट, लसूण आणि लाल मिरचीचा ताजा ठेचा घातलेली वांग्याची भाजी करतात. तो प्रकार अजूनही विसरू शकत नाही.. :) आणि हो, त्या लसूण घातलेल्या भाजिमधे गुळ अजिबात नसतो.
ReplyDeleteकॉमेंट पब्लिश केली नाही तरीही हरकत नाय!!! :)
dhanyavad kanchan.. khup surekh alay foto ..bhaji chan zaliye he kalavlyabaddal ani foto pathavlyabaddal khup abhar..
ReplyDeletepls send me the english translation of the recipe
ReplyDeletebharli vangi.
my Bhaji came our excellent ..thanks for the recipe.
ReplyDeletethanks
ReplyDeleteAajch try keli bharli wangi, chan zali hoti...thanks for the recipe...
ReplyDeletemadhe eka telugu maitrinikade wangyachi chatni khalli...khupach tasty hoti...tyachi recipe sangu shakshil ka?
Hi Uma
ReplyDeletecommentsathi dhanyavad. me nakki try karun pahin wangyachi chatani ani mag post karen recipe.
Mi Bhaji Karun pahili ani ti khup chan jhali ani majha navara khup khush jhala thanks to you
ReplyDeleteHi Mi tomato rice karun pahila mastch lagato.. Anek receipe ajkal chakali madhye pahunch kelya jatat ... Tumhi mhnje Internetwaril 'Ruchira''Annapurna' or 'supashastrache pustak' zala ahat :)
ReplyDeleteThanks Anagha
ReplyDeleteI followed ur blog for bharli tondli n it was a hit. Am goin to try this today. Thanks a lot
ReplyDeleteThanks
Deleteaamchya kade mixer nhi, chinch pan nahi , gud amhala avadat nahi , fakt masala ani shengdanyache redimade kut ahe ,...tari pan bhaji 1 no. bante........
ReplyDeletethanks for the recipie......
Sundar... Krun pahili khup tasty lagli
ReplyDeleteKhup chan zali bharleli Vangi .Thanks for receipe
ReplyDelete