कोकोनट राईस - Coconut Rice

Coconut Rice in English वेळ: १५-२० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १/२ कप तांदूळ १/२ कप खवलेला ताजा नारळ २ टेस्पून तेल १/२ कप शे...

Coconut Rice in English

वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
१/२ कप तांदूळ
१/२ कप खवलेला ताजा नारळ
२ टेस्पून तेल
१/२ कप शेंगदाणे
२ टिस्पून उडीद डाळ
१ टेस्पून चणा डाळ
१/४ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून हिंग
१ कढीपत्ता टाहाळी
३-४ लाल सुक्या मिरच्या
१/२ टिस्पून किसलेले आलं
चवीपुरते मीठ

कृती:
१) भात मोकळा शिजवून घ्यावा. शिजवताना भातात मीठ घालावे. भात शिजला की ताटात मोकळा करून ठेवावा. कोमट झाला की ओलं खोबरं घालून मिक्स करावे. आवडीनुसार खोबरं कमीजास्त करावे.
२) तेल कढल्यात गरम करावे. आच मध्यम ठेवावी. आधी शेंगदाणे घालावे. खमंग तळून बाजूला काढावे. अशाच प्रकारे चणा डाळ आणि उडीद डाळ तळावी. हे सर्व भातावर घालावे.
३) उरलेल्या तेलात फोडणी करावी. मोहोरी, हिंग, कढीपत्ता, किसलेले आले आणि लाल मिरच्या घालाव्यात. ही फोडणी भातावर घालावी.
४) हलक्या हाताने भातात मिक्स करावे. तयार भात थोडा गरम करायचा असल्यास मायक्रोवेव्हमध्ये गरम करावा. किंवा जाड कढईत मंद आचेवर झाकण ठेवून ३-४ मिनिटे गरम करावा.

टीप:
१) हा भात कोणत्याही रस्सा भाजीबरोबर चांगला लागतो. किंवा टॉमेटो चटणीबरोबरही छान लागतो.

Related

South Indian 6411332628371747008

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item