वांगी भाताचा मसाला - Vangi Bhatacha Masala
Vangi Bhat Masala in English वेळ: १५ मिनिटे ४ ते ५ टेस्पून वांगी भात रेसिपीसाठी इथे क्लिक करा. साहित्य: १ टेस्पून चणा डाळ १ टेस्...
https://chakali.blogspot.com/2014/11/vangi-bhatacha-masala.html
Vangi Bhat Masala in English
वेळ: १५ मिनिटे
४ ते ५ टेस्पून
वांगी भात रेसिपीसाठी इथे क्लिक करा.
साहित्य:
१ टेस्पून चणा डाळ
१ टेस्पून उडीद डाळ
२ टिस्पून धने
२ टेस्पून भाजलेला खोबऱ्याचा किस
५-६ काळी मिरी
१ इंच दालचिनी
२-३ सुक्या मिरच्या
१ ते २ चक्रीफुलाच्या पाकळ्या (अख्खं चक्रीफूल वापरू नये, त्याच्या एक किंवा दोन पाकळ्या वापराव्यात कारण याचा फ्लेवर खूप उग्र असतो)
१ टिस्पून तेल
कृती:
१) तेल गरम करून त्यात चणा डाळ मंद आचेवर खमंग भाजावी. बाजूला काढून ठेवावी.
२) नंतर राहिलेल्या तेलात उडीद डाळ भाजावी. बाजूला काढून ठेवावी.
३) त्याच कढईत धणे आणि काळी मिरी हलकेच परतून घ्यावे. साधारण मिनिटभर.. बाजूला काढून ठेवावे.
४) आच बंद करावी. मिरच्या घालून नुसत्या कढईच्या उष्णतेवर परताव्यात. सर्व साहित्य थंड होवू द्यावे.
५) गार झाल्यावर आधी चणा डाळ. उडीद डाळ, धणे, मिरी, दालचिनी आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर खोबरे घालून परत बारीक करावे.
हा मसाला वांगी भाताला घालू शकतो.

पण वांगी भात कसा करायचा मुळात....?
ReplyDeletevangi bhat link
Deleteवैदेही ताई वांगी भाताचा मसाला किती दिवस टिकतो? म्हणजे बाहेर ठेवायचा की फ्रीजमध्ये किती दिवस राहू शकतो?
ReplyDeletebakichya masalyasarkhach changla rahil.. fridgemadhye thevla tar changle.
DeleteCan we use other substitute instead of eggplant ?? my hubby dnt like eggplant dats y...:)
ReplyDeleteyes, you may use green peas, potato, tondali etc.
Delete