वांगीभात - Vangi Bhat
Vangi Bhat in English वेळ: २५-३० मिनिटे वाढणी: ३-४ जणांसाठी साहित्य: १ कप तांदूळ (बासमती किंवा तुकडा बासमती चालेल) ७-८ लहान वांगी ...

वेळ: २५-३० मिनिटे
वाढणी: ३-४ जणांसाठी
साहित्य:
१ कप तांदूळ (बासमती किंवा तुकडा बासमती चालेल)
७-८ लहान वांगी (साधारण १/४ किलो), मोठ्या फोडी कराव्यात
फोडणीसाठी:- २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, ७-८ पानं कढीपत्ता
१ टेस्पून वांगीभात मसाला
चवीपुरते मीठ
वांगी तळण्यासाठी तेल
१ तमालपत्र आणि १-२ वेलची
कृती:
१) तांदूळ पाण्यात १५-२० मिनिटे भिजत घालावा. पाणी काढून टाकावे. भात मोकळा आणि जरा फडफडीत शिजवावा. शिजवताना त्यात मीठ, तमालपत्र आणि वेलची घालावी. भात शिजल्यावर तमालपत्र आणि वेलची काढून टाकावी.
२) कढईत तेल गरम करून त्यात वांगी तळून घ्यावी. (खाली टीप पहा)
३) मोठ्या जाड बुडाच्या कढईत २-३ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात तळलेली वांगी, थोडे मीठ आणि वांगीभात मसाला घालावा. लगेच भात घालून मिक्स करावे. जर कोरडे कोरडे वाटले तर थोडेसे तूप घालावे. चव पाहून लागल्यास मसाला किंवा मीठ घालावे.
मंद आचेवर मिक्स करावे. कढईवर जड झाकण ठेवून वाफ काढावी. तळाला भात चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
भात गरमच सर्व्ह करावा.
टीप:
१) तळण्यासाठी तेल कमीच घ्यावे आणि वांगी ३-४ बॅचमध्ये तळावी. जे उरलेले तेल असेल तेच फोडणीसाठी वापरावे म्हणजे तळणीचे पुढे काय करावे हा प्रश्न उरत नाही.