आमटीचे धिरडे - Amatiche Dhirade
Amatiche Dhirade in English वेळ: १५ मिनिटे ४ मध्यम धिरडी साहित्य: १ कप आमटी १/२ कप पाणी (टीप) धिरड्याचे पीठ (तांदळाचे, ज्वारीचे, अस...
https://chakali.blogspot.com/2014/03/amatiche-dhirade.html?m=0
Amatiche Dhirade in English
वेळ: १५ मिनिटे
४ मध्यम धिरडी
साहित्य:
१ कप आमटी
१/२ कप पाणी (टीप)
धिरड्याचे पीठ (तांदळाचे, ज्वारीचे, असे मिक्स पीठ)
चवीनुसार मिरचीची पेस्ट
१/२ टिस्पून लसूण पेस्ट (ऐच्छिक)
१/२ टिस्पून जीरे
चवीनुसार मीठ
तेल
कृती:
१) आमटी एका वाडग्यात घ्यावी. त्यात धिरड्याचे पीठ आणि जीरे घालून मिक्स करावे. आवश्यकतेनुसार पाणी घालावे. चव पाहून मीठ आणि मिरचीपेस्ट घालावी. हवी असल्यास लसूण पेस्ट घालून मिक्स करावे. मिश्रण थोडे पातळसर असायला हवे म्हणजे धिरडे कुरकुरीत होते.
२) नॉनस्टीक तवा तापवून त्यावर तेल घालावे. तवा चांगला तापला कि डावेने भिजवलेले पीठ घालून धिरडे घालावे. मध्यम आचेवर, कडेने तेल सोडून एक बाजू व्यवस्थित होवू द्यावीत.
३) कालथ्याने बाजू बदलावी आणि दुसरी बाजूसुद्धा भाजावी.
तयार धिरडे चटणीबरोबर सर्व्ह करावे.
टीपा:
१) आमटीच्या दाटपणावर पाण्याचे प्रमाण ठरवावे. अंदाज घेवून पीठ भिजवावे.
२) वेगवेगळी पीठे मिक्स करून वापरा. जसे तांदूळ, ज्वारी, बेसन, मटकी, मसूर इत्यादी.

pan aamti kashachi havi
ReplyDeletekonatihi chalel. Sadhi amti kiva palak, methi ghatleli amti suddha chalel. Fakt tyamadhye batata, shenga asha goshti asalyas tya kadhavya lagtil. Kinva mash karun tyat vaparu shakto.
Deleteकाहीही लिहीता का राव! आमटीचे धिरडे म्हणे...उद्या तुम्ही भाताचे वरण आणि पोळीचे सूप कराल!
ReplyDeleteआमटीचे धिरडे खरंच चांगले लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सतत वेगळे प्रयोग करत राहिल्यानेच नवनवीन गोष्टी माहित होतात. त्यातल्या आपल्याला आवडतात त्या ठेवाव्या, उरलेल्या सोडून द्या.
Deleteआमटीचं धिरडं हा प्रकार पारंपारिक आहे. आमच्याकडे नेहमी करतात. मी लहानपणापासून खात आले आहे. इथे रेसिपी पाहून छान वाटलं.
ReplyDeleteकमेंटसाठी धन्यवाद.
Delete