पास्ता इन स्पीनच-मश्रूम सॉस - Spinach Mushroom Pasta

Spinach Pasta in English वेळ: ३० मिनिटे वाढणी: ४ साहित्य: दिड कप पेने पास्ता १ कप चिरलेला पालक २ टिस्पून लसूण, बारीक चिरून ६-७ म...

Spinach Pasta in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४


साहित्य:
दिड कप पेने पास्ता
१ कप चिरलेला पालक
२ टिस्पून लसूण, बारीक चिरून
६-७ मश्रुम्स, उभे काप
दिड कप गरम दूध
२ टिस्पून मैदा
१ टेस्पून बटर
१/४ टिस्पून काळी मिरीपूड
चवीपुरते मीठ
२ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
इटालियन सिझनिंग
किसलेले चीज
रेड चिली फ्लेक्स

कृती:
१) मोठ्या पातेल्यात पुरेसे पाणी उकळवावे. पाणी उकळले कि त्यात १ टिस्पून मीठ आणि पास्ता घालावा. १०-१५ मिनिटे पास्ता शिजवून घ्यावा. चाळणीत ओतून पाणी काढून टाकावे.
२) आता व्हाईट सॉस बनवावा. त्यासाठी कढईत बटर गरम करावे. त्यात मैदा घालून मंद आचेवर २०-३० सेकंद परतावे. गरम दूध घालून नीट ढवळावे ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. स्मूथ असा सॉस तयार झाला कि मिरपूड आणि मीठ घालावे.
३) दुसऱ्या एका कढईत ऑलीव्ह ऑईल गरम करावे. त्यात लसूण आणि मश्रूम घालून परतावे. मश्रूम थोडे आळले कि त्यात पालक घालावा आणि शिजवावा. थोडेसे मीठ घालावे.
४) आता शिजवलेला पास्ता आणि व्हाईट सॉस घालावा. मध्यम आचेवर मिक्स करावे. इटालियन सिझनिंग आणि चवीपुरते मीठ घालावे. नीट मिक्स करावे.
५) सर्व्हिंग प्लेटमध्ये वाढावे. वरून इटालियन सिझनिंग, चीज आणि चिली फ्लेक्स घालून सजवावे.
गरमच सर्व्ह करावे.

टीप:
१) पालक ब्लांच करून त्याची प्युरीसुद्धा घालू शकतो.

Related

Spinach 7219422663624566785

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item