टोफू पॉकेट्स - Tofu Pocket
Tofu Pockets in English वेळ: ३० मिनिटे ६ ते ७ मध्यम पॉकेट्स साहित्य: ::::सारणासाठी:::: १२५ ग्राम टोफू १ मध्यम कांदा, बारीक चिरून १...
https://chakali.blogspot.com/2013/08/tofu-pocket.html?m=0
Tofu Pockets in English
वेळ: ३० मिनिटे
६ ते ७ मध्यम पॉकेट्स
साहित्य:
::::सारणासाठी::::
१२५ ग्राम टोफू
१ मध्यम कांदा, बारीक चिरून
१ मध्यम टॉमेटो, बारीक चिरून
१ लहान भोपळी मिरची, बारीक चिरून
१ कप किसलेले चीज
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जीरे पूड
१/२ टिस्पून चाट मसाला
२ टिस्पून तेल
चवीपुरते मीठ
::::कव्हरसाठी::::
१ कप गव्हाचे पीठ (चव जास्त चांगली होण्यासाठी मैदा वापरावा.)
१/४ कप बेसन
२ टिस्पून गरम तेल
चवीपुरते मीठ
इतर साहित्य
अंदाजे १/४ कप तेल
कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात कोथिंबीर आणि हिरवी मिरची परतावी. कांदा लालसर होईस्तोवर परतावा. नंतर टॉमेटो आणि भोपळी मिरची घालून २-३ मिनिटे परतावे.
२) टोफू कुस्करून घालावा. मिक्स करून मिश्रण थोडे कोरडे होवू द्यावे. शेवटी चाट मसाला, धने-जिरे पावडर, आणि मीठ घालून मिक्स करावे. तयार सारण गार होण्यासाठी वाडग्यात काढून ठेवावे.
३) कणिक, बेसन, आणि मीठ एकत्र करावे. त्यात गरम तेल घालावे. पण घालून मध्यम मळावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
४) मळलेल्या पीठाचे एक-दिड इंचाचे गोळे करावे. किंचित जाड लाटावे. सारण भरून त्यावर चीज घालावे. करंजीसारखे फोल्ड करून कडा सील कराव्यात.
पॉकेट्स कशाप्रकारे शिजवाल?
१) शालो फ्राय - नॉनस्टीक तवा घेउन त्यावर थोडे तेल घालावे. तयार पॉकेट्स त्यावर ठेवून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी शिजू द्यावे.
२) डीप फ्राय - आकाराने थोडी लहान पॉकेट्स बनवून तळून काढावेत.
३) बेकिंग - तयार केलेल्या पॉकेट्सला तेल लावून घ्यावे. कमी टेम्परेचर वर बेक करावे.
गरमागरम पॉकेट्स तिखट चटणीबरोबर सर्व्ह करावे.

HI Vaidehi
ReplyDeleteRecipe Tar Khupch Chaan Disat Aahe. But Tofu Mhanje kaay aahe. Aani Te Kontya Store Made Avaielable Asel.
Comment sathi dhanyavad. Tofu mhanje Soyabean che paneer. Reliance Fresh, Star bazaar, More ashya konatyahi supermarket madhye milel.
DeleteThanku So Much Vaidehi.
ReplyDelete