खजूर शेंगदाण्याचा लाडू - Khajoor shengdana ladu

Khajoor Peanuts Laddu in English वेळ: १० मिनिटे वाढणी: ८ ते ९ लहान लाडू साहित्य: १५० ग्राम खजूर (खालील टिप पहा) १/२ कप शेंगदाणे ...

Khajoor Peanuts Laddu in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: ८ ते ९ लहान लाडू


साहित्य:
१५० ग्राम खजूर (खालील टिप पहा)
१/२ कप शेंगदाणे

कृती:
१) शेंगदाणे भाजून एकदम भरड असा कुट करावा.
२) खजुरातील बिया काढून टाकाव्यात. खजूर मिक्सरमध्ये वाटावेत. एका वाडग्यात काढून ठेवावे. त्यात निम्मा शेंगदाण्याचा कुट घालावा. हाताला थोडे तूप चोळून घ्यावे आणि मळावे. नीट मिक्स झाले की उरलेला कुट घालून मिक्स करावे.
३) मळलेल्या गोळ्याचे १ इंचाचे लाडू बनवावे.
पटकन होणारी ही रेसिपी शुगर-फ्री आणि पौष्टिकही आहे. गणपती प्रसादासाठी साजेशीच!!

जर शेंगदाण्याऐवजी ड्राय-फ्रुट्स घालायची असतील तर रेसिपी पुढीलप्रमाणे - इथे क्लिक करा.

टीप:
१) खजूर मऊ हवेत. थोडेसे कडक असतील तर थोड्या तुपावर मंद आचेवर परता. थोडे मऊ झाले कि मिक्सरमध्ये बारीक करा आणि वरीलप्रमाणेच वापरा.
२) काळा खजूर असल्यास अजून छान चव येते.

Related

Travel 5061566138164776599

Post a Comment Default Comments

  1. your recipes are very easy to make and many are new.Some recipes on chakli are very traditional and I love to read them also

    ReplyDelete
  2. Hi Vaidehi,
    Mi just attach karun baghitle he ladu ani te kharch khup chan zalet. Thank you so much.

    ReplyDelete
  3. hey its look really nice how to prepare this dish can u send me the recipe on to my mail anna@q8living.com

    ReplyDelete
  4. Khajoor madhe sugar naste ka?

    ReplyDelete
    Replies
    1. Ho aste, pan ti natural fruit sugar aste.... extra processed keleli sugar apan ithe vaparat nahi ahot..

      Delete
  5. Replies
    1. shengdane khamang bhajun ghetle ki jast tiktat.. sadharn 8-10 divas sahaj tiktat.

      Delete
  6. Hello Vaidehi,
    khup sundar receipe asatat.
    mala khup aavadatat karayla..
    baby sathi kahi recipe post karal ka..

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item