Raiawalyachi Chutney

Rai awalyachi Chutney in English वेळ: ५ मिनिटे ४ ते ५ जणांसाठी साहित्य: पाव कप रायआवळे पाउण कप ओलं खोबरं ३ हिरव्या मिरच्या (मध्यम...

Rai awalyachi Chutney in English

वेळ: ५ मिनिटे
४ ते ५ जणांसाठी


साहित्य:
पाव कप रायआवळे
पाउण कप ओलं खोबरं
३ हिरव्या मिरच्या (मध्यम तिखट)
१/२ टिस्पून जीरे
१/२ ते १ टिस्पून साखर
चवीपुरते मीठ

कृती:
१) राय आवळ्यातील बिया काढून बाजूचा गर घ्यावा. त्यानंतर सर्व साहित्य (पाणी न घालता) एकत्र मिक्सरमध्ये वाटावे.

टीप:
१) खोबरं ताजं खवलेले असेल तर चांगले. फ्रीजमधील वापरायचे झाल्यास चटणी करायच्या तासभर आधी लागेल तेवढं खोबरं काढून ठेवावे. रूम टेंपरेचरला आल्यावर मग मिक्सरमध्ये फिरवावे. थंड खोबरे मिक्सरमध्ये फिरवल्यास त्याचे स्निग्धांश वेगळा होतो. आणि चटणी चोथापाणी दिसते.

Related

Marathi 1872869906942858367

Post a Comment Default Comments

  1. Are you in US? If yes where did you get aavala?

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item