चोको-कोको नगेट्स - Choco-Coco Nuggets
Choco-Coco Nuggets in English वेळ: २० मिनिटे ६-७ नगेट्स साहित्य: १/२ कप ओल्या नारळाचा चव ३ टेस्पून साखर २ टेस्पून दुध १७५ ग्राम च...
https://chakali.blogspot.com/2013/08/choco-coco-nuggets.html?m=0
Choco-Coco Nuggets in English
वेळ: २० मिनिटे
६-७ नगेट्स
साहित्य:
१/२ कप ओल्या नारळाचा चव
३ टेस्पून साखर
२ टेस्पून दुध
१७५ ग्राम चोकॉलेट
कृती:
१) मध्यम आकाराच्या नॉनस्टीक भांड्यात नारळ, साखर आणि दूध मिक्स करावे. मध्यम आचेवर शिजवावे. सतत ढवळावे.
२) मिश्रण घट्टसर बनले की आच बंद करावी. मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. थंड होवू द्यावे. त्याचे १ इंचाचे गोळे बनवावे. १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे.
३) प्लास्टीकचा जाड कागद किंवा अलुमिनियम फॉईलचा तुकडा तयार ठेवावा.
४) चॉकलेट बारीक चिरून घ्यावे. डबल बॉइलरमध्ये ठेवून वितळवून घ्यावे. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे. त्याच्या आतील आकाराचे दुसरे एखादे भांडे किंवा वाडगे घ्यावे. त्यात चॉकलेट घालावे. हे भांडे अधांतरी ठेवून हाताने किंवा पक्कडीने धरून ठेवावे. फक्त २ ते ३ इंच तळ पाण्यात बुडवावा. खालील पातेल्यातील पाणी अजिबात यात शिरू देऊ नये. चॉकलेट सतत ढवळा म्हणजे पाण्याच्या उष्णतेने हळूहळू चॉकलेट वितळेल.
५) चॉकलेट वितळले की नारळाचे गोळे यात बुडवून बाहेर काढा. प्लास्टिकच्या कागदावर ठेवा. थोडावेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. नंतर सर्व्ह करा.
जर हवा थंड असेल तर फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. पण उकाड्यात चॉकलेट वितळते. अशावेळी फ्रीजमध्ये ठेवावे. खायच्या आधी २० मिनिटे बाहेर काढावे.
टीप:
१) आवडीनुसार यात बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स जसे काजू बदाम पिस्ता घालू शकतो.
२) नारळाच्या सारणात मधोमध बदामाचा तुकडा घालू शकतो.

hi
ReplyDeletemastach aahey...... i will try.........
Nice Idea... interesting...
ReplyDeleteThanks
ReplyDeletechocolate sauce use kela tar chalel ka?
ReplyDeleteshravani
Chocolate sauce chalnar nahi karan sauce chi consistency patal aste. Ghari chocolate vitalavun vaparave. Cooking chocolate milte.
ReplyDeleteKhup chan.... Tuzya recipies vachun ch tya try karnyachi umed detat..... Thnx.... For such nice blog
ReplyDelete_ Dipti Bhatavkar
dhanyavad Dipti
ReplyDelete