कॉलीफ्लॉवरची भाजी - Cauliflower Sabzi

Cauliflower Sabzi in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: १ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ ...

Cauliflower Sabzi in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
१ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ ते ३ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
३ सुक्या लाल मिरच्या
५ ते ६ लसूण पाकळ्या, ठेचून (ऐच्छिक)
१/२ टीस्पून किसलेले आले
१ कढीपत्त्याची डहाळी
२ टीस्पून गूळ किंवा साखर (किंवा चवीनुसार)
चवीपुरते मीठ

कृती:
१) कॉलीफ्लॉवरची जाड देठे काढून टाकावीत. तुरे हातानेच तोडावेत. छोटे तुरे करावेत म्हणजे लगेच शिजेल. मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत.
२) कढईत तेल गरम करून त्यात लसूण घालून काही सेकंद परतावे. मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून फोडणी करावी. काही सेकंद परतावे.
३) कॉलीफ्लॉवरमधील पाणी काढून टाकावे आणि कढईत घालावा. मीठ घालून ढवळावे. कढईवर पाण्याने भरलेली थाळी ठेवावी आणि मंद आचेवर कॉलीफ्लॉवर शिजू द्यावा. मध्येमध्ये ढवळावे.
४) कॉलीफ्लॉवर जेव्हा ८० % शिजेल तेव्हा गूळ घालावा. आणि अजून थोडावेळ शिजवावे. किसलेले आले घालून मिक्स करावे. कढई गॅसवरून खाली उतरवावी.
गरम पोळीबरोबर भाजी सर्व्ह करावी.

Nutritional Info: Per Serving
Calories: 69 | Carbs: 5 g | Fat: 5 g | Protein: 2 g | Sat. Fat: 1 g | Sugar: 2 g

Related

Marathi 5947743509103913731

Post a Comment Default Comments

  1. hello chakali, HaPpY nEw YeAr !! :) $#wëTã

    ReplyDelete
  2. वैदेही,
    तुमच्या बऱ्याच receipes मी करून बघितल्या. खूपच छान होतात. विशेषतः तुम्ही जे प्रमाण देत ते फारच perfect असतं.
    खूप छान. अशाच नवीन नवीन receipes post करत राहा.....
    सविता

    ReplyDelete
  3. धन्यवाद सविता

    ReplyDelete
  4. hi vaidehi!
    tuzya sagalyach recepies uttam ahet
    chhan banatat padarth
    thnx!!
    mugachya appyanchi recepie de na plz
    dr snehal kshirsagar

    ReplyDelete
  5. Thanks for this recipe tai, perfect zhali bhaji! fakt ek, rang nahi ala chaan...ase ka bara zhale asel?

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item