आंबोशीचे लोणचे - Amboshiche lonche
Amboshiche lonche in English वेळ: २५ मिनिटे साधारण दीड कप लोणचे साहित्य: ३/४ कप आंबोशी (सुकलेल्या कैरीच्या फोडी) (घरी बनवण्यासाठ...
https://chakali.blogspot.com/2012/08/amboshiche-lonche.html?m=0
वेळ: २५ मिनिटे
साधारण दीड कप लोणचे
साहित्य:
३/४ कप आंबोशी (सुकलेल्या कैरीच्या फोडी) (घरी बनवण्यासाठी स्टेप १ पाहा)
दोन कप गूळ
१/४ कप लाल मोहोरीची पावडर
१ टिस्पून तळलेली मेथीची पावडर (मेथी दाणे तळून कुटून घ्यावे)
१/४ कप मिठ किंवा चवीनुसार
१/२ टिस्पून मोहोरी
१ टिस्पून हळद
१ टिस्पून हिंग
१/४ कप तेल
कृती:
१) कैरीची साल काढून पांढर्या भागाच्या फोडी कराव्या. जरासे मिठ लावून ७ ते ८ दिवस उन्हात खडखडीत वाळवाव्यात.
२) २ वाट्या पाणी उकळवून गॅस बंद करावा. सुकलेल्या फोडी रात्री या गरम पाण्यात घालाव्यात. आणि झाकून ठेवावे. सकाळी पाणी काढून टाकावे. फोडींना मिठ चोळून घ्यावे.
३) एका भांड्यात मोहोरी पावडर आणि १/४ कप पाणी घालून पांढरट होईस्तोवर फेसावे. किंवा मिक्सरमध्ये घालून फेसावे. फक्त पाणी हळूहळू घालावे.
४) तेलात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. फोडणी गार होवू द्यावी.
५) गूळामध्ये थोडे पाणी घालून गॅसवर ठेवावे. गूळ पातळ झाला कि गॅस बंद करावा.
६) फेसलेली मोहोरी पावडर, मेथी पावडर, कोमट झालेला गूळाचा पाक आणि गार झालेली फोडणी फोडीमध्ये घालून मिक्स करावे.
तयार लोणचे लगेच खाता येईल. पण ८ दिवसांनी मुरल्यावर अजून छान लागते.
Hi Vaidehi
ReplyDeleteHe lonche kiti divas tikel??yat tikhat ghalata yeil ka??
Ashwini K
Hi Ashwini
ReplyDelete6 mahine sahaj tikel
यामध्ये तिखट नाही घालायचे🤔
ReplyDeleteYaaat tikhat ghalat nahit karan mohori powder fesun jo tikhatpana yeto to puresa hoto.
ReplyDeleteAvdat asalyas tikhat ghalu shakto.