साबुदाणा चिकवड्या - Sabudana Papad
Chikwadya in English साधारण २० मध्यम चिकवड्या साहित्य: १/२ कप साबुदाणा १/२ टीस्पून मीठ साबुदाणा भिजवायला पुरेसे पाणी कृती: १...
https://chakali.blogspot.com/2012/05/chikwadi-chikwadya.html?m=0
Chikwadya in English
साधारण २० मध्यम चिकवड्या
साहित्य:
१/२ कप साबुदाणा
१/२ टीस्पून मीठ
साबुदाणा भिजवायला पुरेसे पाणी
कृती:
१) साबुदाणा भांड्यात ठेवून त्यात साबुदाण्याच्या पातळीवर अर्धा इंच येईल इतपत पाणी घालावे. मीठ घालून हलकेच मिक्स करावे. साबुदाणा किमान ४ ते ५ तास भिजू द्यावा.
२) इडलीस्टॅंडच्या प्रत्येक खोबणीत तेलाचा हात लावून घ्यावा. नंतर भिजलेल्या साबुदाण्याचा एकेरी थर (single layer) पसरवून घ्यावा. इडली कुकरमध्ये तळाला दीड इंच पाणी ठेवावे आणि गरम करावे. पाण्यास उकळी फुटली कि स्टॅंड आत ठेवावा. झाकण लावून घ्यावे. (शिटी काढून टाकावी.) १० मिनिटे वाफ काढावी.
३) वाफ जिरली कि चिकवड्या चमच्याने हलकेच काढून घ्याव्यात. प्लास्टीक पेपरवर घालून उन्हात वाळवाव्यात. एका बाजू वाळली कि बाजू पालटून दुसरी बाजू उन्हात वाळवावी.
टीपा:
१) या रेसिपीमध्ये बरेच बदल करता येतील. जसे साबुदाण्याबरोबर थोडा किसलेला बटाटा असे मिक्स घालू शकतो. किंवा यात थोडे जीरेसुद्धा छान लागेल. किंवा भरडसर वाटलेली मिरची घातल्यास छान चव लागते.

किती सोपी रेसिपी आहे! Thank you.
ReplyDeleteधन्यवाद कांचन
ReplyDeletekhari gammat ardhawat suklelya sabudana paapdi palavnyat yete. superb texture.
ReplyDeletehi !!!
ReplyDeleteag tu print cha format change ka kela??
adhicha changala hota g :(
@ Anonymous,
ReplyDeletePrint sathi navin widget takale aahe. tyatoon pdf madhye hi recipe save karata yeil
adhichya format madhye unwanted gosthi print vhayachya tyamule kagad jast vaya jaycha.
मला हा ब्लॉग फार आवडला... खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद लिपी
ReplyDeletekhup soppi recipe ahe apan asyach prakare amhala recipe chi mahati dili tar amhi ajacya gruhini ghar basun sarava unal kam karu kona kadun banaun ghenyachi garaj lagnar nahi ...........................thank you
ReplyDeleteThanks Anita
DeleteNice recipe i like this blog good work
ReplyDelete