फलाफल रॅप्स - Falafel Wraps

Falafel Wraps in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ४ पिटा ब्रेड - रेसिपीसाठी इथे क्लिक करा ८ फलाफल - रेसिपीसाठी इथे क...

Falafel Wraps in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
४ पिटा ब्रेड - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
८ फलाफल - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
१/२ कप त्झात्झीकी सॉस - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
सलाडसाठी::::
१/२ कप काकडी, सोलून लहान चौकोनी तुकडे
१/४ कप टोमॅटो, लहान चौकोनी तुकडे
२ टेस्पून लाल कांदा, बारीक चिरून
२ टेस्पून पार्सली, बारीक चोरून
१ टीस्पून लिंबाचा रस
१ लहान हिरवी मिरची, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
१/४ कप लेट्युस, उभे पातळ काप

कृती:

१) वरील साहित्यात सलाडसाठी जे जिन्नस लागतात ते मिक्स करावेत.
२) पिटा ब्रेड मायक्रोवेव्ह मध्ये १० ते १२ सेकंद गरम करावे. प्रत्येक पिटा ब्रेडवर  २ फलाफल ठेवून त्यावर २-३ टेस्पून सलाड घालावे. वरून थोडा त्झात्झीकी सॉस घालावा.
पिटा-फलाफल रॅप तयार करून लगेच सर्व्ह करावे.

Related

Snack 8359840889812383602

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item