मसाल्याची गोळी - Masalyachi Goli
Masala Goli in English वेळ: १५ मिनिटे १० ते १२ गोळ्या साहित्य: १ कप ओलं खोबरं किंवा सुके किसलेले खोबरे १ टिस्पून तेल २ टिस्पून लाल त...
https://chakali.blogspot.com/2011/09/masalyachi-goli.html?m=0
Masala Goli in English
वेळ: १५ मिनिटे
१० ते १२ गोळ्या
साहित्य:
१ कप ओलं खोबरं किंवा सुके किसलेले खोबरे
१ टिस्पून तेल
२ टिस्पून लाल तिखट किंवा ६-७ लाल सुक्या मिरच्या
१ टिस्पून बडिशेप
७ ते ८ मोठ्या लसणीच्या पाकळ्या
चवीपुरते मिठ
१ टिस्पून धणेपूड
कृती:
१) १ टिस्पून तेल गरम करून त्यात ओलं खोबरं किंवा सुकं किसलेलं खोबरं खरपूस भाजून घ्यावे. जर ओलं खोबरं वापरत असाल तर चांगले सुकेस्तोवर परतावे नाहीतर टिकत नाही.
२) नंतर यात बडीशेप, लसूण, धणेपूड, लाल तिखट/ लाल मिरच्या आणि मिठ घालून एकदम बारीक वाटून घ्यावे. पाणी घालू नये म्हणजे आठ-पंधरा दिवस सहज टिकतील.
याच्या १ टेस्पूनच्या गोळ्या बनवून ठेवाव्यात. लागेल तसे भाजी आमटीमध्ये वापरता येते तसेच चवही छान येते.

namaskar, nakki kuthlya bhajyanmadhe vaparaave? mhanje, amhi gharapasun lamb rahat aslyane hi paddhat changli vatli masala vaparnyachi. krupaya khulasa karava. dhanyawad.
ReplyDeleteज्या भाज्यांमध्ये नारळ आणि लसूण वापरतात अशा भाज्यांमध्ये चालेल. जसे बटाट्याचा रस्सा किंवा उसळी.
ReplyDeleteFish curry masalyachi recipe dya
Deletelal sukya mirchya kontya vapravyat .........
ReplyDeletetikhat have asel tar sankeshwari chilli vaparavyat
Deleteranga yayla hava asel tar thodya kashmiri chilies vaparavyat.